TRENDING:

महाराष्ट्रात नामांतराचा धडाका सुरूच, शहरांनंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं!

Last Updated:

महाराष्ट्रामध्ये नामांतराचा धडाका सुरूच आहे. शहरांच्या नामांतरानंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचं नावही बदलण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रामध्ये नामांतराचा धडाका सुरूच आहे. शहरांच्या नामांतरानंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचं नावही बदलण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र सरकारने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्याची अधिसूचना जारी केली आहे. याआधी राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असं केलं होतं.
महाराष्ट्रात नामांतराचा धडाका सुरूच, शहरांनंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं!
महाराष्ट्रात नामांतराचा धडाका सुरूच, शहरांनंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं!
advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं अजित पवार म्हणाले. मागच्याच महिन्यात अजित पवार यांनी अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून रेल्वे स्टेशनचं नावही शहराच्या नावासोबत जुळणारं करावं, अशी विनंती केली होती.

advertisement

'ही दीर्घकाळापासूनची मागणी होती, जी आता पूर्ण झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत, त्यामुळे या नामकरणाला विशेष महत्त्व आहे', असं अजित पवार म्हणाले आहेत. अनेक संघटना आणि नागरिक रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी करत होते. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असं मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यानंतर अहमदनगरचं नामांतर झालं. अहिल्यादेवी होळकर या 18 व्या शतकातील महान मराठा राणी होत्या. मध्य भारतातील मराठा शासित माळवा राज्याच्या त्या 18व्या शतकातील महाराणी होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला होता, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात नामांतराचा धडाका सुरूच, शहरांनंतर आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल