'फुले समाधान' या जातीचे गहु बाजारात उपलब्ध आहे. त्याचबरोबर उत्पादन चांगले असून या गव्हाची चपाती देखील चांगली तयार होते. 'फुले त्र्यंबक' जातीचे गहु महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आहे. उत्पादन तसेच खाण्यासाठी चांगला आहे. 110 ते 120 दिवस कालावधीत येतो, मध्यम ते भारी जमिनीत येतो. 'तपोवन' या जातीचे गहु देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. PDKV वाशिम या जातीचे गहु चपातीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गावरान गव्हासारखा तो गहु आहे. अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले गहु आहे.
advertisement
उशीरा पेरणीसाठी फुले शाश्वत या जातीचे गहु उपयुक्त आहे. त्याच बरोबर नेत्रावती या जातीचे गहु देखील चांगला आहे. बेकार उपयोगासाठी फुले सात्विक या जातीचे गहु उत्तम आहे. फुले अनुपम या जातीचे गहु देखील एक नवीन आणि चांगले उत्पादन देणारे आहे. लोकवन या जातीच्या गव्हाची देखील शेतकरी पेरणी करतात. खपली गहू हा औषधीगुण असलेला गहू आहे. याचीही मागणी होत असते. MSCS 2971, DDK1025, DDK1029 या जातीचे गहु देखील शेतकरी विचारात घेऊ शकातात. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची परिस्थिती, पेरणीची तारीख आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करून गव्हाच्या जातीची निवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र खरपुडी चे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ एस व्ही सोनूने यानी केलं आहे.