पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील दिनेश पवार हे गुरूवारी सायंकाळी जवळा पांचाळ शिवारातील युवराज बार येथे गेले होते. त्यानंतर काही वेळाने गुलाब गाडेकर व त्यांचा मुलगा युवराज गाडेकर तेथे आले. त्यांनी दिनेशला बारच्या बाहेर बोलावून घेतले आणि शिविगाळ केली.या शिविगाळ बाबत दिनेश हे विचारणा करत असताना तुम्ही रेडगावचे लोक फालतू आहात असे म्हणत त्यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर ते घाबरून गेले होते.
advertisement
दरम्यान दिनेश यांना मारहाण सूरू असताना धनराज गाडेकर आणि आणखी एक जण तेथे आला आणि त्याने पण त्यांना मारहाण करायला सुरूवात केली होती.नळाच्या पाईपने केलेल्या या मारहाणीत दिनेश यांच्या पाठीवर, पोटावर, पायावर आणि मांडीवर मोठ वळ उठले आहेत.यामुळे त्यांना धड चालता येत आहे न झोपता येत आहे.
आज सकाळी त्यांनी ही संपूर्ण घटना गावकऱ्यांना सांगितल्यानंतर काही गावकऱ्यांनी त्यांना घेऊन थेट आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठले.या प्रकरणी दिनेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुलाब गाडेकर, युवराज गाडेकर, धनराज गाडेकर व अन्य एका विरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.अद्याप या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही आहे.त्यामुळे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.