लग्नाला नक्की या बरं का...
मिळालेल्या माहितीनुसार, संदेशात “नमस्कार, लग्नाला नक्की या बरं का... 30/08/2025. Love is the master key that opens the gate of happiness” असे लिहिलेले होते. या मजकुराखाली एक पीडीएफ फाइल असल्यासारखे दिसत होते, पण प्रत्यक्षात ती एक APK (Android Application Package) फाइल होती. ही फाइल फोन हॅक करण्यासाठी तयार करण्यात आली होती.
advertisement
बँक खात्यातून 1 लाख 90 हजार रुपये गायब
फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्याने ती फाइल उघडताच सायबर गुन्हेगारांना त्यांच्या फोनमधील खासगी डेटाचा ॲक्सेस मिळाला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 90 हजार रुपये गायब झाले. या प्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशन आणि सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, निमंत्रण एका पीडीएफ फाइलच्या रूपात दिसत असले तरी, ती एक APK फाइल होती. या फाइलला क्लिक केल्याने सायबर गुन्हेगारांनी फोनमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांच्या खात्यातून 1 लाख 90 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ही घटना दर्शवते की सायबर गुन्हेगार रोज नवीन युक्त्या वापरून सामान्य नागरिकांना कशा प्रकारे लक्ष्य करत आहेत.