मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पिक वाहून गेलं आहे.काहींची तर जमीन देखील खरडून गेली आहे.त्याचसोबत शाळेत शिकणाऱ्या मुलांची शालेय साहित्य देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे शिकायचं कसं असा प्रश्न आता मुलांना पडला आहे.अशात आता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. नागेश मडके यांनी पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे. ज्यामध्ये एक शालेय बॅग आणि वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.
advertisement
नागेश मडके यांनी या संदर्भातला व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नागेश मडके हे एका दुकानावरून वह्या पुस्तकांची खरेदी करताना दिसत आहेत. तसेच या दुकानावरून त्यांनी काही बॅगा देखील घेतल्या आहेत. हे सगळं साहित्य घेऊन त्यांनी पुरग्रस्त भागात जाऊन त्यांनी वाटप केले आहे. त्यामुळे नागेश मडके यांच्या मदतीने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
मराठा आंदोलकांनाही केली होती मदत
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी मराठा आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.नागेश मडके यांनी ट्रकभरून बिस्लेरी पाण्याच्या बॉटल मुंबईच्या दिशेने पाठवल्या होत्या.
मराठायोद्धा या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धाराशीव मधून हत्ती घेऊन मराठा बांधवासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहे. बिस्लेरीच्या पाण्यांच्या बॉटलने भरलेला हत्ती घेऊन निघालो आहे.आमच्या भावाला फोन लावून थेट बिस्लेरीच्या बॉटल्सनी हत्तीच भरायला लावला आहे.त्यामुळे नागेश मडकेंने धाराशीवमधून मुंबईत मराठा बांधवांसाठी पाणी पाठवत आहेत.
या व्हिडिओत नागेश मडके म्हणतात की, तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.मनोज दादा जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठू नका. जितकी आपल्याला कमी पडेल तितकं आम्ही आणून द्यायला तयार आहोत,असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सकल मराठा समाजाकडून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे खुप आभार मानले आहेत. आणि या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.