TRENDING:

तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं आहे? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील? अर्ज कसा करायचा?

Last Updated:

New Ration Card : आजच्या काळात आधार कार्डप्रमाणेच रेशन कार्ड हे देखील प्रत्येकाकडे असणे आवश्यक ठरले आहे. कारण ते केवळ स्वस्त धान्य घेण्यासाठीच नव्हे, तर अनेक शासकीय कामांमध्ये, शाळा-कॉलेज प्रवेशापासून कर्ज मिळवण्यापर्यंत एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात आधार कार्डप्रमाणेच रेशन कार्ड हे देखील प्रत्येकाकडे असणे आवश्यक ठरले आहे. कारण ते केवळ स्वस्त धान्य घेण्यासाठीच नव्हे, तर अनेक शासकीय कामांमध्ये, शाळा-कॉलेज प्रवेशापासून कर्ज मिळवण्यापर्यंत एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, जुन्या कार्डावर नावे समाविष्ट/वगळणे किंवा तक्रार नोंदवणे याबाबत उत्सुकता वाढली आहे. आता ही सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतात.
ration card
ration card
advertisement

आवश्यक कागदपत्रे

नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची गरज असते. जसे की,

ओळखीचा पुरावा : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा : वीज बिल, भाडेकरार, आधार कार्ड

उत्पन्नाचा दाखला

कुटुंबातील सदस्यांचे फोटो

इतर कागदपत्रे (जुने रेशन कार्ड असल्यास, ते रद्द केल्याचा दाखला)

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा rcms.mahafood.gov.in तिथे Public Login या पर्यायावर क्लिक करा. नवीन वापरकर्ता असल्यास New User Sign Up Here वर क्लिक करून नोंदणी करा.आवश्यक माहिती भरून युजर आयडी व पासवर्ड तयार करा.आधार नंबरद्वारे देखील नोंदणी करता येते.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून, Apply For New Ration Card या पर्यायावर क्लिक करा.अर्जात मागितलेली सर्व माहिती नीट भरा व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर Submit For Payment वर क्लिक करा आणि शुल्क ऑनलाइन भरा.

advertisement

तुमचा अर्ज तहसील कार्यालयात पडताळणीसाठी पाठवला जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रेशन कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल किंवा संबंधित कार्यालयातून घेता येईल.

ऑनलाइन प्रक्रियेचे फायदे

नागरिकांना शासकीय कार्यालयांची दगदग टाळता येते.

वेळ आणि खर्च वाचतो.

अर्जाची स्थिती वेबसाईटवरून सहज पाहता येते.

त्रुटी कमी होऊन प्रक्रियेला गती मिळते.

डिजिटल पद्धतीने मिळणारे फायदे

advertisement

सरकारने रेशन कार्ड प्रक्रियेला पूर्णपणे डिजिटल केल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. आधी महिनोनमहिने लागणारे काम आता काही दिवसांतच पूर्ण होते. तसेच नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे किंवा रेशन कार्डाबाबत तक्रार करणे या सर्व सुविधा देखील याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं आहे? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील? अर्ज कसा करायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल