TRENDING:

घर खरेदीसाठी कर्ज घेताय का? मग पीएम आवास योजनेची 1.80 लाखाची सबसिडी कशी मिळवायची? प्रक्रिया काय?

Last Updated:

Property Rules : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न प्रत्येक भारतीयाच्या मनात असते. ग्रामीण भाग असो किंवा महानगर, डोक्यावर कायमचे छप्पर मिळावे यासाठी कुटुंब आयुष्यभर मेहनत करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न प्रत्येक भारतीयाच्या मनात असते. ग्रामीण भाग असो किंवा महानगर, डोक्यावर कायमचे छप्पर मिळावे यासाठी कुटुंब आयुष्यभर मेहनत करते. ही गरज ओळखून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली. ग्रामीण भागासाठी PMAY-ग्रामीण आणि शहरांसाठी PMAY-शहरी ही योजना राबवली जात आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या मध्यम व निम्न उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
PM Awas Yojana
PM Awas Yojana
advertisement

शहरातील घरखरेदीसाठी मोठी मदत

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme – ISS) लागू आहे. या योजनेमुळे गृहकर्ज घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना तब्बल १.८० रु लाखांपर्यंत व्याज सवलत मिळू शकते. ही रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाते, त्यामुळे कर्जावरील एकूण आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होतो. घर खरेदीचा निर्णय घेताना ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

advertisement

PMAY-शहरीतील चार प्रमुख घटक

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) चार वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागली आहे.जसे की,

पहिला घटक - म्हणजे लाभार्थी-नेतृत्वाखालील बांधकाम (BLC). स्वतःची जमीन असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील (EWS) लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

दुसरा घटक - अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप (AHP) असून, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी खाजगी बांधकाम व्यावसायिकांच्या सहकार्याने घरे बांधली जातात.

advertisement

तिसरा घटक - अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग (ARH) असून स्थलांतरित कामगार व भाडेकरूंना स्वस्त भाड्याने घरे उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. तसेच चौथा सर्वाधिक लोकप्रिय घटक म्हणजे व्याज अनुदान योजना, जी गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी लागू होते.

व्याज अनुदान योजना नेमकी काय आहे?

या योजनेअंतर्गत EWS, LIG आणि MIG वर्गातील कुटुंबांना गृहकर्जावर व्याज सवलत दिली जाते. वार्षिक उत्पन्न मर्यादेनुसार पात्र लाभार्थ्यांना ३५ लाखांपर्यंतच्या घरासाठी गृहकर्ज घेता येते. यामध्ये पहिल्या ठरावीक कर्ज रकमेवर सरकारकडून व्याज अनुदान दिले जाते. एकूण मिळून १.८० लाखांपर्यंतची सूट थेट कर्ज खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे मासिक हप्ता कमी होतो.

advertisement

अर्ज कसा कराल?

व्याज अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी PMAY-शहरीच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच, ज्या बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे, त्या बँकेच्या मदतीनेही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते. अर्ज करताना पात्रतेची तपासणी केली जाते आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील, बँक खात्याची माहिती, उत्पन्नाचा पुरावा आणि गृहकर्जाशी संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर अर्ज सबमिट केला जातो.

advertisement

अनुदान कसे मिळते?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

ही रक्कम थेट बचत खात्यात न येता, गृहकर्जाच्या खात्यात समायोजित केली जाते. त्यामुळे कर्जावरील व्याज कमी होते आणि घराचे स्वप्न अधिक सुलभ होते. एकूणच, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही शहरातील घरखरेदीसाठी सरकारकडून मिळणारी एक महत्त्वाची आर्थिक मदत ठरत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घर खरेदीसाठी कर्ज घेताय का? मग पीएम आवास योजनेची 1.80 लाखाची सबसिडी कशी मिळवायची? प्रक्रिया काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल