बुलढाणा : पतीने क्रूरपणे पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक परिसरात घडली आहे. लक्ष्मी पवन धुंदाळे या 24 वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विवाहित लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला आहे.
जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक परिसरात पतीने पत्नीची उटी बुद्रुक येथे धुंदाळे परिवार शेतीवर उदरनिर्वाह करत असून कुटुंबात चार सदस्य राहत होते. गजानन आणि पुष्पा धुंदाळे यांचा मुलगा पवन धुंदाळे हा दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीसोबत विवाहबद्ध झाला होता. दाम्पत्याला सात महिन्यांची मुलगी आहे. विवाहानंतर दोघेही पवनच्या आई-वडिलांसोबतच राहत होते.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून दाम्पत्यामध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने संतापाच्या भरात पवन धुंदाळे यांनी पत्नी लक्ष्मीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला एवढा गंभीर होता की लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पती पोलिसांच्या ताब्यात
घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह पंचनामा करण्यात आला. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी पवन धुंदाळे यांनी प्रारंभी पोलिसांना विरोध केला असला तरी चौकशीतच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्येचे नेमंक कारण अद्याप समोर नाही
या हत्याकांडामुळे उटी बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून समाजातही संतापाची लाट उसळली आहे. सात महिन्यांच्या बालिकेवर आई-वडिलांच्या या दु:खद घटनेची छाया पडली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून हत्येचे नेमके कारण काय याबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
