TRENDING:

धाराशिव हादरलं! झोपेत कुऱ्हाडीने वार, मायलेकीची हत्या, 5 वर्षाच्या मुलामुळे नराधम बापाचं कांड उघडकीस

Last Updated:

धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि ८ वर्षांच्या लेकीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि ८ वर्षांच्या लेकीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. आरोपीनं मायलेकीची हत्या केल्यानंतर गावकऱ्यांनी घरावर हल्ला केल्याचा बनाव रचला होता. आपल्या सासऱ्यांना फोन करून तशी माहिती देखील दिली होती. मात्र आरोपीच्या ५ वर्षांच्या मुलानं आरोपीचा भांडाफोड केला. वडिलांनीच आई आणि बहिणीला मारल्याची माहिती मुलानं आपल्या आजोबांना दिली. त्यानंतर हे भयानक कांड उघडकीस आलं आहे. यानंतर आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
धाराशिवमध्ये मायलेकीची हत्या
धाराशिवमध्ये मायलेकीची हत्या
advertisement

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अजित अपन्ना वासुदेव याच्याविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडी (भुसणी) इथं घडली. लिंबूबाई अजित वासुदेव आणि मानसी अजित वासुदेव असं हत्या झालेल्या मायलेकीचं नाव आहे.

नेमकी घटना काय घडली?

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा आणि आठ वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. घटनेच्या वेळीत ५ वर्षांचा मुलगा घाबरुन घराबाहेर पळून गेला होता. त्यामुळे सुदैवाने तो बचावला. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने स्वतः मुरूम पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन मुली आणि एक मुलगा आहे. थोरली मुलगी आजोळी राहते. तर दोन नंबरची मुलगी तिसरीत शिकत होती. सर्वात धाकटा मुलगा आहे. आरोपी अजितने मंगळवारी मध्यरात्री पत्नी लिंबूबाई आणि मुलगी मानसी या दोघांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने वार केले. वार इतके भीषण होते की, दोघींचा जागीच मृत्यू झाला.

गावातील लोक मारहाण करीत असल्याचा बनाव

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नासाचा पराक्रम, आर्टेमिस-2 चा नवा विक्रम; 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं
सर्व पहा

दोघींचा खून केल्यानंतर आरोपीने सासरे नागनाथ शेमले यांना फोन करून गावातील लोक घरावर चढून हल्ला करत आहेत, असा बनाव रचला. घटनेची माहिती मिळताच सासरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नातू भाग्येश याने वडिलांनीच आई आणि बहिणीवर कुऱ्हाडीने वार केल्याचं सांगितलं. यानंतर आरोपीचा भांडाफोड झाला. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिव हादरलं! झोपेत कुऱ्हाडीने वार, मायलेकीची हत्या, 5 वर्षाच्या मुलामुळे नराधम बापाचं कांड उघडकीस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल