TRENDING:

IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांची बदली, अश्विनी भिडे बीएमसी आयुक्तपदी, 'मुंबई मेट्रो'चा चार्ज कोणाकडे?

Last Updated:

Ashwini Bhide : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी आता 'मेट्रो वुमेन' अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील मुंबई मेट्रोचा पदभार कोणाकडे सोपवण्यात येणार, याची उत्सुकता लागली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आर्थिक वर्ष संपताना राज्य सरकारने आज दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी आता 'मेट्रो वुमेन' अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती.
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, अश्विनी भिडे बीएमसी आयुक्तपदी,  'मुंबई मेट्रो'चा चार्ज कोणाकडे?
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, अश्विनी भिडे बीएमसी आयुक्तपदी, 'मुंबई मेट्रो'चा चार्ज कोणाकडे?
advertisement

त्यामुळे त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे सोपवली जाणार याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचा आदेश जाहीर केला. सनदी अधिकारी अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय अधिकारी मानल्या जातात. सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे आज, ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे अश्विनी भिडे यांना आजच मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे.

advertisement

अश्विनी भिडे या १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो ३ च्या कामात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. आता मुंबई महापालिकेची धुरा त्यांच्या हाती आली आहे. अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असणार आहेत.

advertisement

अश्विनी भिडे यांच्याकडील मेट्रोसह इतर खात्याचा पदभार कोणाकडे?

आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल महामंडळासोबत अतिरिक्त पदभार देखील होता.त्याबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे खनिकर्म विभागाचा मुख्य सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार होता. आता, या विभागाची जबाबदारी आयएएस लोकेश चंद्रा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहानपणी ऊसतोडणी, शिक्षण अर्धवट पण हार नाही मानली, उभा केला मसाल्यांचा ब्रँड, माया यांच्या यशाची कहाणी Video
सर्व पहा

अश्विनी भिडे यांच्याकडे 'मुंबई मेट्रो रेल महामंडळा'च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार होता. मुंबई महापालिकेच्या आयुक्तीपदी वर्णी लागल्यानंतरही अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. राज्य सरकारने आजच्या आदेशात तूर्तास तरी मुंबई मेट्रो रेल महामंडळाची जबाबदारी इतर अधिकाऱ्यांकडे सोपवली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात कोणाकडे ही जबाबदारी जाईल, याकडे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांची बदली, अश्विनी भिडे बीएमसी आयुक्तपदी, 'मुंबई मेट्रो'चा चार्ज कोणाकडे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल