TRENDING:

IAS Transfer: राज्यात बदल्यांचा धडाका! 11 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल

Last Updated:

IAS Transfer: फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्य सरकारने आज तब्बल 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.  एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बड्या समावेश आहे.
News18
News18
advertisement

कोणकोणत्या अधिकाऱ्यांची झाली बदली?

  1. राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:२००५), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे.
  2. श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
  3. रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.
  4. advertisement

  5. कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:२०११) यांची महावितरण, कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.
  6. लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:२०१५), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
  7. गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
  8. advertisement

  9. डॉ. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:२०१५), सह व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
  10. पंकज देवरे (आयएएस:एससीएस:२०१६) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.
  11. मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. advertisement

  13. करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  14. अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. सर्व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाबासाहेबांनी वापरलेले टेबल ते भांडी, पुण्यातील ऐतिहासिक संग्रहालयात जिवंत ठेवा, तुम्ही पाहिला का? Video
सर्व पहा

IAS Transferred: राज्यात मार्च एन्डला बदल्यांचा धडाका! तुकाराम मुंढेसह 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transfer: राज्यात बदल्यांचा धडाका! 11 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल