IAS Transferred: राज्यात मार्च एन्डला बदल्यांचा धडाका! तुकाराम मुंढेसह 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
IAS Transferred : फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
मुंबई: आर्थिक वर्ष संपताना राज्य सरकारने आज तब्बल 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. आणखी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचा समावेश आहे.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांची झाली बदली?
- विनीत वैद्य सिंगल (भाप्रसे) - यांची प्रधान सचिव , मृद आणि जलसंधरण विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
- तुकाराम मुंढे (भाप्रसे) यांची - प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन , महसूल वन विभाग येथे बदली झाली आहे.
- लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांची - मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
- लहू माळी (भाप्रसे) यांची- व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित येथे बदली झाली आहे.
- परिमल सिंह (भाप्रसे) यांची - सचिव (कृषी), कृषी आणि पदुम विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे.
- विकास चंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांची- अप्पर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
- माणिक गुरसाळ (भाप्रसे) यांची - सचिव, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.
- पृथ्वीराज बी. पी (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
- आश्विनी भिडे (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
- प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची- आयुक्त, मत्य्यव्यवसाय मुंबई येथे बदली झाली आहे.
advertisement
आर्थिक वर्ष संपताना राज्य सरकारने आज दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. सर्व अधिकाऱ्यांना आजच पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अश्विनी भिडे मुंबईच्या नव्या आयुक्त
सामान्य प्रशासन विभागाने अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचा आदेश जाहीर केला. सनदी अधिकारी अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय अधिकारी मानल्या जातात. सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे आज, ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे अश्विनी भिडे यांना आजच मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: राज्यात मार्च एन्डला बदल्यांचा धडाका! तुकाराम मुंढेसह 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल









