लक्ष्मण घाटोळ, नाशिक : महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान राजकारणाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार सलीम शेख यांनी केला आहे. निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांऐवजी हिंदू–मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न होत आहे असं त्यांनी म्हंटलं आहे.
advertisement
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधून सलग गेल्या दहा वर्षांपासून नगरसेवक असलेले सलीम शेख यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केले. ते म्हणाले की, काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत त्यांच्या विरोधात एआयच्या माध्यमातून बनवलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.
मी आत्महत्या करेन
ते पुढे म्हणाले की, हे व्हिडिओ जर खरे ठरले तर मी भर चौकात स्वतःला फाशी लावून घेईल अस भाविक आव्हान केलं या वेळी समील शेख यांना अश्रू अनावर झाले,माझ सामाजिक काम मी केलेला विकास यावर न बोलता निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा हा प्रयत्न चुकीच
उमेदवाराला अश्रू अनावर
या प्रकरणावर बोलताना सलीम शेख भावुक झाले. “निवडणूक ही लोकसेवेची संधी असते. धर्म, जात किंवा समाजाच्या नावावर मतं मागणं योग्य नाही. निवडणूक एक दिवसाची असते, पण समाजातील तणाव आणि दरी कायमची राहू शकते,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून, आणखी दोन उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीतून शिंदे गट १०२ जागांवर, तर अजित पवार गट ४२ जागांवर निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ७९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३१, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३० आणि काँग्रेस २२ उमेदवारांसह मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीने ५५ जागांवर आपले उमेदवार दिले असून, याशिवाय रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन सेना यांनीही काही प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत
