आता इंडिगो एअरलाईन्स आपली सेवा पूर्ववत करताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विमानसेवा आता पूर्ववत होताना दिसत आहे. सायंकाळचे स्थगित केलेले विमान 14 डिसेंबरपासून पूर्ववत केले जाणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणारी बेंगळुरू सेवा 16 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. यामुळे आता छत्रपती संभाजीनगर बेंगळुरू विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हैदराबादसाठी असलेली दुपारच्या सत्रातील विमानसेवा 15 ते 31 डिसेंबर या तारखेदरम्यान स्थगित केली जाणार आहे.
advertisement
शिवाय, हैदराबादसाठीची सकाळची नियमित सेवा एका 78 आसनी एटीआर विमानाद्वारे सुरू राहणार आहे. आता 1 जानेवारी 2026 पासून हिवाळी सत्रातील टाईम टेबल अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. चिकलठाणा विमानतळावरून मुंबई (१), नवी दिल्ली, हैदराबाद (१) आणि गोवा (आठवड्यातून ३ दिवस) या तीन विमानसेवा सुरू होणार आहे.
नोव्हेंबरमध्ये रद्द झालेल्या इंडिगो सेवा
1 नोव्हेंबर रोजी, रात्री 09:15 वाजता छत्रपती संभाजीनगरवरून मुंबईचे विमान रद्द.
3 नोव्हेंबर रोजी, सकाळी 07:50 वा. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणारे विमान रद्द.
7 नोव्हेंबर रोजी, मुंबईहून सायंकाळी येणारे आणि रात्री 09:15 वाजता मुंबईला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
7 नोव्हेंबर रोजी, दिल्लीहून सायंकाळी 04:55 वाजता छत्रपती संभाजीनगरला येणारे आणि परत रात्री 07:15 वाजता दिल्लीला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
11 नोव्हेंबर रोजी, गोवा येथून दुपारी 02:05 वाजता येणारे आणि दुपारी 04:45 वाजता गोव्याला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
