सी अमरनाथ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सी. अमरनाथ याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित डॉक्टर महिलेशी ओळख वाढवली. मैत्री घट्ट झाल्यानंतर तो पीडितेला भेटण्यासाठी थेट छत्रपती संभाजीनगरात आला. भेटीदरम्यान, आरोपीने पीडितेचा गैरफायदा घेतला आणि एका हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला.
फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग
अत्याचार केल्यानंतर आरोपी येथेच थांबला नाही. त्याने महिलेचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी देत त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आरोपीने डॉक्टर महिलेकडून आतापर्यंत चार लाख रुपये उकळले.
advertisement
सततच्या धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि पैशांच्या मागणीमुळे पीडित महिला पूर्णपणे त्रस्त झाली होती. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर महिलेने धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
तेलंगणातून आरोपीला अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपी सी. अमरनाथ याला त्याच्या मूळ गावी तेलंगणा राज्यातून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
