छत्रपती संभाजीनगर : शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात महादेवाची पिंड देखील सापडली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
advertisement
छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. नियाज नजीर शेख असे एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचे नाव आहे. कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागात तो राहत होता. विशेष म्हणजे आरोपी नियाज हा 2018 मध्ये झालेल्या राजाबाजार दंगलीतील आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (एनडीपीएस) रविवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत 34 प्रकारचे अमली पदार्थ आणि एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मध्यरात्री अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा, एनडीपीएस आणि अवैध हत्यार बाळगण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख नियाज शेख नजीर ऊर्फ सिकंदर (वय 35. रा. मुजीब कॉलनी, गल्ली नं. 2. कटकट गेट) याला अटक करण्यात आली आहे.
कोण आहे आरोपी?
- शेख नियाज ड्रग्स पेडलर
- 2018 च्या दंगलीतील आरोपी
- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुरवायचा ड्रग्ज
- शहरातील कटकट गेट परिसरातील मुजीब कॉलनीमध्ये राहायला
- आरोपीच्या राहत्या घरात ड्रग्स आणि जादूटोण्याच्या साहित्याचा खर्च
पोलिसांच्या माहितीनुसार जादूटोण्याचा साहित्य हे पैशाचा पाऊस पडण्यासाठी आरोपीने जमा केलेलं होतं असा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या मुलीचे ऑपरेशन होते आणि त्यासाठीच अघोरी विद्याने पैशांचा पाऊस पाडण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, ही प्राथमिक माहिती आहे आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी मिळाल्यावर अजून यामध्ये माहिती समोर येईल असं पोलिसांनी सांगितले आहे.
जादूटोण्याचे काय काय साहित्य सापडले ?
- आरोपीच्या घरात जनावरांची दोन हाडे
- कासवाचे वरचे अवरण असलेले हाड
- काळ्या रंगाचे कापडी भुताचे मास्क
- चामडी हंटर
- रसायनाच्या बाटल्या
- कवड्याच्या माळा
- रिल्व्हर रंगाची धातूची ८४ नाणी
- सोनेरी रंगाची 79 नाणी
- दोन इंजेक्शन सिरींज
- महादेवाची पिंड असलेले अगरबत्ती स्टँड
- काचेच्या 10 रिकाम्या बाटल्या
- 9 काळ्या रंगाचे दगडगोटे
- 12 ग्रॅम ड्रग्स आणि 20 ग्राम संशयास्पद पावडर
- काही इलेक्ट्रिक वजन काटे आणि गावठी कट्टा
हे साहित्य आढळून आले आहे.
हे ही वाचा :
लाडाचा जावईच निघाला चोर, पोलिसांनी कसा केला भांडाफोड? छ. संभाजीनगरची घटना