TRENDING:

शस्त्रं विकणारी टोळी आहे, पोलिसांना मेसेज, सापळा रचून एकाला पकडलं, त्याने धडाधड नावं सांगितली

Last Updated:

अवैध शस्त्र विक्री प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून ८ गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहेत. जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल आणून त्याची जळगावात विक्री करणाऱ्या सात जणांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव शस्त्रास्त्रं विकणारी टोळी
जळगाव शस्त्रास्त्रं विकणारी टोळी
advertisement

या संदर्भात शनिवारी (७ मार्च) पत्रकार परिषद झाली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

advertisement

केशव भालेराव याला खाक्या दाखविताच त्याने ते दोन कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यापैकी एक कट्टा यशला आणि दुसरा कट्टा गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गौरव यालादेखील अटक करुन त्याच्याकडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतूस आणि दुचाकी (क्र. एमएच १९, सीएम १३१२) हस्तगत केली.

advertisement

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याला नेरी (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणून विकत असल्याची कबुली दिली. यात केशव भालेराव, विकास प्रकाश काकडे (२८, रा. साळसिंगी ता, बोदवड), यश नन्नवरे, गौरव साळवे, जगदीश गजानन महाजन (२०, शहापूर, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), कैलास राजेंद्र माळी (२२, रा. बोरकुंड, ता. जि. धुळे) यांच्याकडून ८ गावठी पिस्तूल आणि १० जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

समाधान निकम याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तर केशव भालेराव हादेखील एका गुन्ह्यात पोलिसांना सापडत नव्हता. त्याचप्रमाणे गौरव साळवे हा पिंप्राळा येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा मित्र आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शस्त्रं विकणारी टोळी आहे, पोलिसांना मेसेज, सापळा रचून एकाला पकडलं, त्याने धडाधड नावं सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल