याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार केला. यात दोघांनाही गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले होते. भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ ही घटना घडलीय. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केली. भूसावळ शहरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2024 6:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या, धावत्या कारवर गोळीबाराचा थरार
