मनस्ताप झाल्याने चिठ्ठी लिहिली अन् स्वत:ला संपवलं
श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. अखेर मनस्ताप जास्त झाल्याने त्याने एक चिठ्ठी लिहिली अन् स्वत:ला संपवलं. श्यामने त्याच्या शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिलंय? पाहा
advertisement
काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?
माझी काही चूक नव्हती पप्पा, याच्यामध्ये या वेळेस. मला आधी काही माहिती पण नव्हती. फक्त माझ्या मित्रांचे भांडण चालू होते. त्यात मी पडलो आणि त्याच्यानंतर त्या एका मुलाने माझी कॉलर पकडली आणि मग मी त्याला एकच कानाखाली मारली. तो मुलगा घेऊन आलेला होता बाहेर आणि मला भांडण करायचे नव्हते. त्यासाठी मी प्रिन्सिपल सरांकडे गेलो होतो आणि सरांना मी हे सांगितल्यानंतर मला खूप मारले. गुरु मारतात पण पूर्ण टीचर्स स्टाफ समोर ऐवढे मारले मला आणि तो मुलगा मुले घेऊन आलेला होता त्याला काहीच मारलं नाही, ही रिअॅलिटी आहे आणि मला फक्त माझी इमेज इंम्पार्टट होती.
मी गेल्यानंतर सीसीटीव्ही चेक करून बघा...
अगोदर पण माझी चुकी नव्हती तरी पण काही मुलांनी मिळून मला मारले आणि ते झाल्यानंतर मी प्रिन्सिपल सरांना सांगितले तर तेव्हा सरांनी का बर नाही मारले मग त्या मुलांना? तेव्हा कुठे गेली होती सरांची डेअरिंग? आणि त्या सरांनी मला शिव्या पण दिल्या हे माझ्याकडून सहन नाही होत आहे आता... मी गेल्यानंतर सीसीटीव्ही चेक करून बघा किती मारले होते प्रिन्सिपल सरांनी मला, सॉरी पापा-मम्मी, रामू, सिद्ध त्यांना त्यांना मी दुखावलं असेल त्यांना पण सॉरी मी प्रत्येक वेळेस सर्व ठीक करायचा ट्राय केला बट सगळं माझ्यावरतीच उलट येऊन पडलं, सॉरी हा आणि रामू मी गेल्यानंतर ही स्टोरी टाक, माझ्या इन्स्टांवरती... परत सारी सगळ्यांनाच..
