advertisement

Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई

Last Updated:

सध्या अनेक तरुण-तरुणी नोकरी करत असतानाच स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याकडे वळताना दिसत आहेत.रश्मीने सुद्धा स्वतःचा थंडगार पेय विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

+
News18

News18

मुंबई: सध्या अनेक तरुण-तरुणी नोकरी करत असतानाच स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याकडे वळताना दिसत आहेत. दिवसाचा काही वेळ नोकरीला देऊन उर्वरित वेळात स्वतःचा उद्योग उभा करण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय. आणि हाच ट्रेंड फॉलो करत कांदिवलीतील रश्मीने सुद्धा स्वतःचा थंडगार पेय विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
कांदिवलीमध्ये राहणारी 22 वर्षांची रश्मी घाग. रश्मीने आपले बँकिंग अँड फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून सध्या ती दोन ठिकाणी काम करते. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ती आपला छोटा व्यवसाय सांभाळते, तर संध्याकाळी साडेचार-पाच वाजल्यापासून ती एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.
रश्मीच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर तिची आई अंगणवाडी सेविका आहे, तर वडील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. घरची परिस्थिती स्थिर असली तरी स्वतः काहीतरी वेगळं करण्याची इच्छा रश्मीच्या मनात अनेक वर्षांपासून होती. तिला फूड क्षेत्राची आवड होती, पण सुरुवात कशी करावी हे समजत नव्हतं.
advertisement
शेवटी आता काहीतरी करायचंच असा निर्णय घेत रश्मीने स्वतःच पुढाकार घेतला. तिने स्वतःच्या सेव्हिंग्जमधील पैसे वापरले आणि सोशल मीडिया व YouTube च्या मदतीने विविध पेयांच्या रेसिपी शिकल्या. योग्य माप आणि चव मिळवण्यासाठी तिने घरीच अनेक प्रयोग केले. सरबत, मोहितो, कच्च्या कैरीचा रस, कोकम सरबत यांसारखी पेये ती बनवू लागली.
यानंतर तिने स्वतःचा थंडगार पेयांचा स्टॉल सुरू केला. स्टॉलसाठी लागणारे साहित्य, छत्री, भांडी यासाठी तिने सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला तिच्या या निर्णयाला वडिलांचा विरोध होता, मात्र आईने तिला पाठिंबा दिला. स्टॉल सुरू केल्यानंतर पहिल्याच दोन दिवसांत मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून वडिलांनीही तिच्या कामाला साथ दिली आणि आवश्यक वस्तू आणून मदत केली. रश्मीने व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला. दररोज व्हिडिओ आणि अपडेट्स शेअर करत तिने आपल्या स्टॉलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, ज्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली.
advertisement
सध्या रश्मीचा व्यवसाय चांगला सुरू आहे. आठवड्याच्या दिवसांमध्ये ती रोज सुमारे 3 ते 4 हजार रुपयांचा व्यवसाय करते, तर शनिवार-रविवारी हा आकडा 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत पोहोचतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement