advertisement

Shreyas Iyer : 'आमचं हृदय मोठं म्हणून...', श्रेयस अय्यरच्या बहिणीचा Video व्हायरल, शाहरुखच्या केकेआरला काय म्हणाली?

Last Updated:

Shreyas Iyer Sister Video : केकेआरचा माजी कॅप्टन आणि पंजाब किंग्जचा सरपंच श्रेयस अय्यर याच्या बहिणीने केकेआरला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Shreyas Iyer Sister Dance Video Troll KKR
Shreyas Iyer Sister Dance Video Troll KKR
Shreyas Iyer Sister Dance Video Troll KKR : आयपीएल 2026 च्या हंगामात सर्वात जास्त चर्चेत असलेली टीम म्हणजे पंजाब किंग्ज... श्रेयस अय्यरने आपली विजयाची परंपरा कायम ठेवली असून तीन पैकी दोन मॅच जिंकल्या अन् एक केकेआरविरुद्धची मॅच धुवून निघाली. केकेआरविरुद्ध पंजाब किंग्जला सहज विजय मिळवता आला असता पण पावसाने हजेरी लावली अन् केकेआरला आयता एक गुण मिळाला. अशातच याच मुद्दयावरून श्रेयस अय्यरच्या बहिणीने केकेआरला डिवचण्याची संधी सोडली नाही.

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठाचा व्हिडिओ

सोमवार, 6 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच पावसाने धुवून निघाली. या मॅचनंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठाने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने केलेल्या विधानामुळे केकेआरचे फॅन्स कमालीचे संतापले असून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. तर पंजाबचे फॅन्स तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
advertisement

वादाला तोंड फुटलं

'आमच्या पंजाबच्या लोकांचे हृदय खूप मोठे असते, म्हणूनच आम्ही तुम्हाला 1 पॉइंट दिला,' असं श्रेष्ठाने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं. तिच्या या मस्तीच्या करण्याच्या पद्धतीमुळे वादाला तोंड फुटलं आहे. श्रेष्ठा अय्यर ही एक व्यावसायिक डान्सर आणि कोरिओग्राफर असून ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या भावाला सपोर्ट करताना दिसते. यंदाच्या सीझनमध्ये पंजाब किंग्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे.
advertisement

दोन्ही टीमला 1-1 पॉइंट 

ईडन गार्डन्सवरील या मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही टीमला 1-1 पॉइंट देण्यात आला. या एका पॉइंटमुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचे यंदाच्या सीझनमध्ये खाते उघडले. केकेआरसाठी हा सीझन आतापर्यंत खूप कठीण गेला असून सुरुवातीच्या दोन्ही मॅचेसमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : 'आमचं हृदय मोठं म्हणून...', श्रेयस अय्यरच्या बहिणीचा Video व्हायरल, शाहरुखच्या केकेआरला काय म्हणाली?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement