ऑनलाइन शॉपिंग करताना सावधान! मोठ्या सूटच्या नावाने होऊ शकते फसवणूक, राहा सावधान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण खुप वाढलंय. हे खुपच सोपं आहे आणि आपल्याला बाहेर घसरबसल्या हवं ते प्रोडक्ट मिळतं. पण याचा वापर करत असताना मोठी फसवणूकही होऊ शकते.
मुंबई : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करणं खुप सोपं आणि मजेदार झालं. पण 80% ते 90% डिस्काउंट पाहून तुम्हीही घाई-घाईत खरेदी करत असाल तर तुमचं बँक अकाउंट हे रिकामं होऊ शकतं. स्कॅमर्स हे बनावट वेबसाइट तयार करून सर्वसामान्यांना फसवत आहेत. या साइट्स खऱ्या साइट्ससारख्याच दिसतात. मात्र नंतर तुमचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा चोरतात. तुमचं सामान येत नाही आणि पैसेही गायब होतात.
बनावट वेबसाइट्स मुख्यतः मोठ्या डिस्काउंटची आमिष दाखवतात. म्हणजेच लेटेस्ट मोबाईलवर 70-80 टक्के सूट, ब्रांडेड बॅक अर्ध्या किंमतीत किंवा महाग शूज फक्त शंभर रुपयांत. या ऑफर पाहायला खुप चांगल्या वाटतात, पण खोट्या असतात. खऱ्या कंपन्या एवढं डिस्काउंट कधीच देत नाहीत. फसवणूक करणाऱ्यांना माहिती असतं की, लालसेपोटी लोकं काही विचार न करता पेमेंट करतात.
advertisement
पहिली ट्रिक
बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आधी URL वर लक्षपूर्वी तपासून घ्या. खरी अॅमेझॉनची वेबसाइट ही अॅमेझॉन. इन असते. पण बनावट वेबसाइट अॅमेझॉन-सेल.इन , amaz0nshop.com किंवा flipkart-offers.net सारख्या असू शकतात. लहान-लहान अक्षरं बदलून किंवा .net, .top, .xyz सारखे एक्सटेंशनलावून या साइट तयार केल्या जातात. नेहमी https:// पाहा आणि अॅड्रेस बारमध्ये कुलूप (padlock) असावं. https नसेल तर साइट लगेच बंद करा.
advertisement
दुसरी ट्रिक
वेबसाइटची डिझाइन पाहा. बनावट साइट्सवर फोटो हे धुसर असतात. भाषांमध्ये चुका असतात आणि वाक्यही विचित्र दिसतात. खऱ्या साइट्सवर प्रोफेशनल लूक, स्वच्छ फोटो आणि योग्य हिंद्री-इंग्रजी असते.
तिसरी महत्वाची गोष्टी
advertisement
संपर्क माहिती. खऱ्या वेबसाइटवर फोन नंबर, ईमेल , पूर्ण पत्ता आणि कस्टमर केयर डिटेल्स स्पष्ट दिसतात. बनावट वेबसाइटवर हे नसतं किंवा फक्त WhatsApp नंबर असतो.‘About Us’ पेजही रिकामं किंवा कॉपी-पेस्ट केलेला वाटतो.
चौथा इशारा
फक्त 2 तास बाकी, किंवा फक्त 1 पीस बाकी आहे. ही ट्रिक तुम्हाला विचार न करता खरेदी करण्यासाठी मजबूर करते. खऱ्या सेलमध्ये असा दबाव टाकला जात नाही. वस्तू खरेदी करताना रिव्ह्यूजही चेक करा. तुम्हाला सर्वच रिव्ह्यूज खुप चांगले आणि एकसारखे वाटत असतील तर सावध व्हा. गूगलवर साइटचं नाव सर्च करुन ‘scam’ किंवा ‘fraud’ लावून पाहा. जुन्या साइट्सवर खरे रिव्ह्यूज मिळतील.
advertisement
आपलं बँक अकाउंट वाचवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो करा
- नेहमी अधिकृत अॅप किंवा ओळखीच्या वेबसाइटवरुन खरेदी करा.
- क्रेडिट कार्डचा वापर करा.
- जोपर्यंत साइडवर विश्वास नसेल तोपर्यंत COD (Cash on Delivery) निवडा.
- व्हीपीएन किंवा अँटीव्हायरसचा वापर करा.
- तुम्हाला संशय आला तर खरेदी करू नका. तुम्हाला दुसरीकडे थोडं महाग पडलं तरी चालतं. पण संशय असेल तिथून खरेदी करु नका. डिस्काउंटच्या नादात तुम्ही हजारो रुपये गमावू शकता.
- थोडीशी सावधगिरी बाळगून तुम्ही तुमचा पैसा आणि डेटा बचत करू शकता. पुढच्या वेळी तुम्हाला कुठे 80% डिस्काउंट अॅड दिसेल तेव्हा वर सांगितलेल्या ट्रिक्स अवश्य करुन पाहा. ऑनलाइन शॉपिंगचा आनंद घ्या, पण आमिषाला बळी पडू नका.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ऑनलाइन शॉपिंग करताना सावधान! मोठ्या सूटच्या नावाने होऊ शकते फसवणूक, राहा सावधान









