advertisement

ती व्यक्ती मालिकेतच नाही, तर काढलं कधी! मराठी अभिनेत्याचे आरोप, आदेश बांदेकरांनी दिलं सडेतोड उत्तर

Last Updated:
अभिनेते आदेश बांदेकर यांनी अभिनेते दिगंबर नाईक यांनी केलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
1/9
मराठी इंडस्ट्रीतील दोन अभिनेत्यांमध्ये सध्या आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. रात्री पावणे अकरा वाजता मला लक्ष मालिकेतून काढलं, मालवणी माणसालाच मालवणी माणूस असा आरोप प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यांच्या या आरोपावर अभिनेते आदेश बांदेकर यांनी नाव न घेता सडेतोड उत्तर देत धक्कादायक खुलासा केला. 

2/9
एका मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईक म्हणाले,
एका मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईक म्हणाले, "आदेश बांदेकर मालवणीच आहे ना. माझा मित्रच आहे तो. रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती 'लक्ष्य' मालिका त्याचीच होती."
advertisement
3/9
 "तेव्हा चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं मत असं होतं की हा कॉमेडी करतो. हा गंभीर भूमिका कशी करेल? अर्थात त्यांचं हे मत असू शकतं. पण तेव्हा आदेश बांदेकरांना असं वाटलं नाही का? की हा मालवणी मुलगा आहे आणि मीसुद्धा मालवणी आहे. चला माझ्या मालिकेत याला घेऊया. आता मालवणी मालिकेतच मालवणी लोक नको असतात."

4/9
दिगंबर नाईक यांच्या या स्टेटमेंटवर आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं. आदेश बांदेकर म्हणाले,
दिगंबर नाईक यांच्या या स्टेटमेंटवर आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं. आदेश बांदेकर म्हणाले, "हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे आनंद दे. नुकतंच मी सोशल मीडियावर बघितलं लक्ष्य मालिकेबद्दल कोणीतरी विधान केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मालिकेत कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधीच नव्हती. लक्ष्यचे अनेक भाग झाले. ती व्यक्ती त्या मालिकेतच नाही तर मालिकेतून काढलं असं कसं म्हणता येईल."
advertisement
5/9
आदेश बांदेकर पुढे म्हणाले,
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, "मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना अतिशय नम्रपणे सांगावसं वाटतं की त्या लक्ष्य मालिकेत पाच जणांच्या टीममधला पोलीस कमलेश सावंत हा देवगडचाच मालवणीच. ज्याने आपल्या अभिनयानं ठसा उमटवलाय आता तो दृश्यमच्या चित्रिकरण करतोय. असे किती तरी मालवणी कलाकार आहेत जे रंगदेवतीची सेवा करत आहेत."
advertisement
6/9
 "सोहम प्रोडक्शन केलेली नांदा सौख्यभरे ही मालिका, त्यातील ऋतुजा बागवे ही मालवणी, त्यातली आजी रागिणी सावंत मालवणी. नावं काढायची झाल्यास कित्येक नावं काढता येतील. मालिकेचा निर्माता, मी मालवणी आहे. मी कुडाळचा असंय मालवणी आणि त्याचा माका सार्थ अभिमान असय."

7/9
आदेश बांदेकर पुढे म्हणाले,
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, "लक्ष्य मालिकेतून 5 हजारांहून अधिक कलाकरांनी काम केलंय. त्यांची यादी काढायची झाली ना तर कितीतरी कलावंत तंत्रज्ञ मालवणीच आहेत. पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण प्रत्येक भागाचा प्रांताचा आदर केला पाहिजे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत इथे येतात उत्तम काम करतायत".
advertisement
8/9
 "मी सुद्धा इतकी वर्ष अत्यंत मेहनतीनं, प्रामाणिकपणे मनोरंजनाची सेवा करतोय. त्यामुळे उगाच असं काही तरी विधान करणं त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको, मला यानं काढलं, त्यानं घेतलं नाही. कशाला? त्यापेक्षा आपण काम करूया. आपल्या कामाचा ठसा उमटवूया."

9/9
 "मालवणीमध्ये आम्हाला अभिमान वाटेल असे मच्छिद्र कांबळे. त्यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मालवणातील दशवातर कलाकारांचा आदर आहे. आम्ही कायम प्रत्येकाचा आदर करतो. कारण ते संस्कार आमच्यावर झालेत. दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात. कधीच कोणी विसरू नये. आत्मपरिक्षण करावं. आपण मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करावी."

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement