CIBIL स्कोअर शिवायही पर्सनल लोन घेता येतं का? तुम्हालाही घ्यायचं असेल तर हे वाचाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आपण कितीही पैशांचं नियोजन केलं तरीही काही वेळा लोन घ्यायची गरज पडतेय. अशावेळी अनेक लोक हे पर्सनल लोन घेतात. पण सिबिल स्कोअर नसतानाही पर्सनल लोन घेता येतं का? चला आज याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सिबिल स्कोअर नसतानाही पर्सनल लोन मिळू शकतं का? अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. ज्या लोकांची क्रेडिट हिस्ट्री नाही किंवा ज्यांनी यापूर्वी कधीच लोन घेतलेलं नाही. अशा लोकांसाठी ही माहिती खुप आवशय्क आहे. कारण बँका आणि वित्तीय संस्था लोन देण्यापूर्वी सिबिल स्कोअर (क्रेडिट स्कोअर) ला महत्त्वाचं मानतात. मात्र बदलत्या काळानुसरा, आता असे काही ऑप्शन उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला सिबिल स्कोअर नसतानाही पर्सनल लोन मिळू शकतं.
advertisement
advertisement
advertisement
हे तुमच्यासाठी एक प्रकारचं 'फायनेंशियल रिपोर्ट कार्ड' असतो. ज्यामुळे बँक आणि वित्तीय संस्था आकलन करतात की, तुम्ही लोन घेणे आणि ते फेडण्यासाठी किती योग्य आहात. सीबिल स्कोअर सामान्यतः 300 ते 900 दरम्यान असतं. ते जेवढं जास्त असतं, तेवढ्या सहज तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते.
advertisement
टाटा कॅपिटलनुसार, तुमच्याजवळ क्रेडिट हिस्ट्री नाही, तर अशावेळी तुम्हा ज्या व्यक्तीचं क्रेडिट स्कोअर चांगला आहे (700+) आणि उपत्न स्थिती स्थिर असेल त्याला गॅरंटर बनवू शकता. ती व्यक्ती तुमच्या पैसे फेडण्याच्या क्षमतेची जबाबदारी घेतो. ज्यामुळे लेंडरची जोखिम कमी होते. आई-वडील, जोडीदार, भाऊ-बहीण किंवा कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला तुम्ही गॅरंटर किंवा को-अॅप्लिकेंट बनवू शकता. पण लक्षात ठेवा तुम्ही ईएमआय फेडू शकला नाही तर गॅरंटरला पैसे भरावे लागतील. यामुळे नीट प्लॅनिंग करुनच निर्णय घ्या.
advertisement
लहान रकमेचं लोन निवडा : पहिल्यांदा लोन घेत असाल तर आपल्या मासिक उत्पन्नाच्या हिशोबाने कमी रकमेचं (10 ते 50 हजार रुपये) लोन घ्या. कमी राशीत लेंडरची जोखिम कमी होते. यामुळे मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते. वेळेवर पेमेंट केल्याने तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होते आणि तुम्ही पुढे मोठे लोनही घेऊ शकता.
advertisement
मजबूत उत्पन्नाचा पुरावा जमा करा : सीबिल स्कोअर नसेल तर लेंडर तुमची पैसे भरण्याची क्षमता तपासतात. यामुळे उत्पन्नाचा ठोस पुरावा द्या. म्हणजे, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, आयटीआर आणि नोकरीचं प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्या. स्थिर नोकरी किंवा व्यवसाय आणि चांगली बचत दाखवल्याने लेंडरचा विश्वास वाढतो. काही लेंडर यूटिलिटी बिल पेमेंट हिस्ट्रीही पाहतात.
advertisement
advertisement








