advertisement

Beed Crime : बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास, बीड-पुणे-बीड अन् पोलीस कर्मचाऱ्याने मध्यरात्री 2 ला संपवलं आयुष्य!

Last Updated:

Beed Police Balkrishna Jaybhaye ends Life : जलगाव शहरातील एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिच्या शोधासाठी जायभाये पुणे येथे गेले होते. तपास पूर्ण करून बीडला परत आले अन् टोकाचं पाऊल उचललं.

Beed Police Balkrishna Jaybhaye ends Life
Beed Police Balkrishna Jaybhaye ends Life
Beed Crime News : गेल्या काही दिवसात बीडमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र समोर येतंय. अशातच बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ती झाल्यानंतर तिच्या शोधात एक पोलीस कर्मचारी पुण्याला आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस कर्मचारी पुन्हा बीडला गेला अन् घरी मध्यरात्री पोहोचताच 2 वाजता आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणात नेमकं असं काय घडलं? पुण्यात असं काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायेत.

बेपत्ती मुलीच्या शोधासाठी पुण्याला आले अन्...

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळकृष्ण जायभाये, असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांचे वय 35 वर्षे होते. जलगाव शहरातील एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिच्या शोधासाठी जायभाये पुणे येथे गेले होते. तपास पूर्ण करून आणि संबंधित काम व्यवस्थित हाताळून ते रात्री उशिरा पुण्यावरून आपल्या घरी परतले होते.
advertisement

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला

घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर पोलीस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement

पुण्यात नेमकं असं काय झालं?

पुण्यात नेमकं असं काय झालं? असा सवाल उपस्थित केला जातोय. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे. पोलीस आता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस करत आहेत. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह 

दोन दिवसांपूर्वी बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. बीडमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आलं होतं. काही दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलीस तिचा तपास करत होते. मृत मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. लग्नानंतरचे पहिले सहा महिने ती सासरी होती, अशी माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास, बीड-पुणे-बीड अन् पोलीस कर्मचाऱ्याने मध्यरात्री 2 ला संपवलं आयुष्य!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement