advertisement

खिशाला कात्री! लालपरीचा प्रवास महागला, छ. संभाजीनगरहून कुठं किती तिकीट दर?

Last Updated:

ST Fare Hike: एसटी महामंडळाने साध्या बसच्या तिकीट दरांत वाढ केली आहे. मात्र, ई- बस, शिवशाही बसची भाडेवाढ केलेली नाही.

ST Fare Hike: खिशाला कात्री! लालपरीचा प्रवास महागला, छ. संभाजीनगरहून कुठं किती तिकीट दर?
ST Fare Hike: खिशाला कात्री! लालपरीचा प्रवास महागला, छ. संभाजीनगरहून कुठं किती तिकीट दर?
छत्रपती संभाजीनगर: उन्हाळी सुट्टीत लालपरीने प्रवास करताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून मुंबई, पुणे आणि नागपूर अशा सगळीकडे जाण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
एसटी महामंडळाने साध्या बसच्या तिकीट दरांत वाढ केली आहे. मात्र, ई- बस, शिवशाही बसची भाडेवाढ केलेली नाही. सध्या साधी बससेवा, जलद सेवा, रात्रसेवा (साधारण) या बसगाड्यांसाठी 10 टक्के जादा पैसे मोजावे लागतील. ही भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी लागू असेल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून नागपूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 85 रुपये जादा मोजावे लागतील. तर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 39 रुपये अधिक द्यावे लागतील.
advertisement
कोणत्या मार्गावर किती भाडे?
सध्या नागपूरसाठी 845 रुपये प्रवासभाडे आहे. 15 एप्रिलपासून 85 रुपयांच्या वाढीसह 930 रुपये मोजावे लागतील. मुंबईसाठी 645 रुपयांवरून 708 रुपये तिकीट दर होईल. नाशिकसाठी 343 रुपयांवरून 377,  जळगाव 282 वरून 310 रुपये, भुसावळ 292 वरून 321 रुपये, यवतमाळ 634 वरून 697 रुपये, पुसद 493 वरून 542 रुपये, लातूर 493 वरून 542 रुपये, सोलापूर 554 वरून 609 रुपये, अकोला 423 वरून 465 रुपये, जालना 102 वरून 112 रुपये आणि पुण्यासाठी 393 ऐवजी 432 रुपये तिकीट दर असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
खिशाला कात्री! लालपरीचा प्रवास महागला, छ. संभाजीनगरहून कुठं किती तिकीट दर?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement