Thane Crime : ठाणे हादरले! बाप कामावर अन् चिमुकली एकटी; नराधम मजुराने घरात घुसून केले कृत्य
Last Updated:
Thane Shocking News : ठाणे शहरात राहणाऱ्या एका चिमुकलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटनेत तत्परता दाखवत पोलिसांनी आरोपाली दोन तासांच्या आत अटक केली आहे.
ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा परिसरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक असा प्रकार सोमवारील रात्री घडला आहे. मात्र या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांच नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नराधम मजुराने घरात घुसून...
मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचे बांधकाम करणारे काही मजूर आपल्या कुटुंबासह तिथंच वास्तव्यास आहेत. पीडित मुलगी ही याच एका मजुरांपैकी एका मुलगी आहे. पण सोमवारी रात्री ती आपल्या घरी एकटीच असताना तिथं काम करणाऱ्या दुसऱ्या एका मजूराने पाहिले आणि तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
दोन तासांत नराधमाला अटक
चिमुकलीच्या वडिलांनीती कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने नौपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला दोन तासांच्या आत अटक केली. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane Crime : ठाणे हादरले! बाप कामावर अन् चिमुकली एकटी; नराधम मजुराने घरात घुसून केले कृत्य










