पुण्यात भयानक प्रकार! कारला धक्का लागल्यानं राग अनावर, दोघांनी महामार्गावरच पेटवला अख्खा कंटेनर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कारला कंटेनरचा धक्का लागला. याच रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर...
पुणे : किरकोळ अपघाताचं रूपांतर थेट जाळपोळीत झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिक्रापूर येथील 'जीत ढाब्या'समोर घडली आहे. यात कारला कंटेनरचा धक्का लागला. याच रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर, तर त्यानंतर दोघांनी मालाने भरलेला कंटेनर आगीच्या हवाली केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने कंटेनर (क्रमांक HR 65 B 0697) घेऊन जात होते. शिक्रापूर परिसरात अचानक एक कार कंटेनरसमोर आल्याने तिला कंटेनरचा किरकोळ धक्का लागला. यावरून कारमधील दोघांनी खाली उतरून चालक अंकुश यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
आरोपींनी कारच्या नुकसानीसाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंटेनर पेटवून देण्याची धमकी त्यांनी दिली. अंकुश शर्मा यांनी "कंटेनरमध्ये माल आहे, कृपया तो पेटवू नका" अशी गयावया केली. मात्र आरोपींनी त्यांना पुन्हा मारहाण केली. आरोपींच्या दहशतीमुळे चालक जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्यानंतर आरोपींनी कंटेनरला आग लावून दिली आणि आपल्या कारसह तिथून पोबारा केला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत कंटेनरचे मोठे नुकसान झाले होते. चालक अंकुश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 11:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भयानक प्रकार! कारला धक्का लागल्यानं राग अनावर, दोघांनी महामार्गावरच पेटवला अख्खा कंटेनर








