advertisement

Navi Mumbai Airport : लंडन-दुबई आता घराच्या जवळून?,नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सज्ज; कधी पासून सुरुवात

Last Updated:

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून आता लवकरच परदेशी उड्डाणे घेतली जातील. सिडकोने लवकरच आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचे सांगितले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एप्रिलपासून परदेशी विमानांचा लँडिंग-टेकऑफ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एप्रिलपासून परदेशी विमानांचा लँडिंग-टेकऑफ
नवी मुंबई : नवी मुंबई आता फक्त मुंबईचे उपनगर म्हणून उरले नसून ते आता जगाशी जोडणारे एक मोठे केंद्र बनणार आहे. सिडकोने अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे.येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट आता परदेसातील विमान सेवा सुरु होणार आहे. याचाच अर्थ की आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवी मुंबईकरांना मुंबईच्या विमानतळावर जाण्याची आणि तिथल्या वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज उरणार नाही.
प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
सध्याच्या स्थितीला विमानतळावरुन दररोज 19 हजार लोक प्रवास करता. त्यात 150 विमानांच्या फेऱ्यांद्वारे हे विमानतळ देशातील 76 विविध शहरांशी जोडले गेले आहे. आता प्रवाशांची वाढती संख्या पाहूनच सिडकोने या महिन्यांच्या अखेर आंतरराष्ट्रीय उड्ड्ाणे सुरु करण्याची तयारीही पू्र्ण केली आहे, अशी माहिती सिडकोचे प्रमुख विजय सिंघल यांनी दिलेली आहे.
advertisement
तब्बल एवढ्या कोटींचा विकास आराखडा
केवळ विमानतळच नाही तर संपूर्ण नवी मुंबई शहराचा कायापालट करण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी सिडकोने तब्बल 16 हजार 250 कोटी रुपयांचा अवाढव्या अर्थसंकल्प सादर केलाय. 2026-27 या वर्षासाठीच्या बजेटमध्ये या सर्वसामान्यांची घरे ,चांगले रस्ते आणि महत्त्वाचे म्हणजे वेगवान दळणवळ या सर्वांवर भर देण्यात आलेला आहे. नवी मुंबई या शहराला जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत नेण्याचे हे ध्येय सिडकोचे आहे.
advertisement
भविष्यातील खास सोयीसुविधा
1)प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनस 2 आणि मध्यवर्ती टर्मिनल संकुल उभारले जाणार असून हे सर्व अद्ययावत असतील.
2) शिवाय मालाची ने आणि आण करण्यासाठी येथे फेडेक्स कार्गो हबही तयार करण्याचा विचार असेल.
3) विमानतळावर प्रवाशांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प सुरु होऊ शकतो.
4) रस्ते-रेल्वे आणि विमान वाहतूक एकाच ठिकाणी जोडण्यासाठी मल्टीमोडल ट्रान्सोपर्ट हब ही बांधण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport : लंडन-दुबई आता घराच्या जवळून?,नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सज्ज; कधी पासून सुरुवात
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement