एका चहामुळे कायमची सुटली 7 मित्रांची साथ, काळानं गाठलं अन् चौघांचा डोळ्यासमोर तडफडून मृत्यू
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Amravati: 7 मित्र कारमध्ये बसून मध्यरात्रीच्या सुमारास चहा घेण्यासाठी निघाले होते. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
अमरावती: आयुष्यात सेलिब्रेशन असो किंवा एखादं मोठं संकट... सगळं काही एका वाफाळलेल्या 'कटिंग चहा'सोबत निवळतं. ज्या चहाच्या टपरीवर तासंतास गप्पा रंगल्या, ज्या चहाने मैत्रीचं नातं अधिक घट्ट केलं, त्याच चहाने आज काळजाचे तुकडे हिरावून नेले. "चल, एक चहा मारून येऊ..." हा एका मित्राचा फोन त्या सातही जणांसाठी शेवटचा फोन ठरेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते सातही जण नुसते मित्र नव्हते, तर एकमेकांचे आधार होते. संध्याकाळ झाली की चहाची तलफ अनावर व्हायची. सवयीप्रमाणे एकमेकांना फोन झाले, मेसेज पडले आणि चहाचा प्लॅन ठरला.एक चहासाठी कोणी कार काढली, तर कोणी बाईक. हसत-खिदळत, एकमेकांच्या टाळ्या घेत ही सात मित्र निघाले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
भररस्त्यातच काळाने घाला घातला. जो रस्ता रोजच्या गप्पांचा साक्षीदार होता, तिथेच आज रक्ताचा सडा पडला होता. ज्या मित्रांनी एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचं वचन दिलं दिलं होतं तिथेच एकमेकांचा शेवटचा श्वास डोळ्यादेखत पाहण्याची वेळ आली. एक भयानक अपघात आणि क्षणात सगळं संपलं.
अमरावतीत अकोला मार्गावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली आणि कार तीनदा पलटली. यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (23), मोहम्मद अनस मोहम्मद सईद (22), अब्दुल अवेज मोहम्मद अकील (23) आणि मोहम्मद अनवेज अब्दुल सलीम (23) अशी मृतांची नावे आहेत. तर मोहम्मद हुजेफा (22), मोहम्मद अशर (21) आणि मोहम्मद अनस (24) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
बडनेरा जुनी वस्तीतील हे सातही मित्र सोमवारी मध्यरात्री एकत्र आले होते. तेव्हा ते मोहम्मद अशर याच्या कारने अकोला नाका परिसरात चहा पिण्यासाठी निघाले होते. आरको गॅरेजजवळ पोहोचले असता मागून आलेल्या भरधाव अवजड वाहनाने कारला धडक दिली. त्यामुळे कार तीन वेळा उलटली आणि यात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.
कारचा चुराडा
भरधाव वाहनाच्या धडकेत कार देखील वेगाने उलटली त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. टायर देखील कारपासून वेगळे झाले. या दुर्दैवी घटनेनं बडनेरा परिसरात शोककळा पसरली आहे. विशी-पंचविशीतील तरुणांच्या अकाली जाण्यानं हळहळ व्यक्त होतेय.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
एका चहामुळे कायमची सुटली 7 मित्रांची साथ, काळानं गाठलं अन् चौघांचा डोळ्यासमोर तडफडून मृत्यू










