advertisement

त्या मागणीसाठी गरोदर पत्नीला पट्ट्यानं मारलं; आळंदीतील 29 वर्षीय विवाहितेनं गाठलं थेट पोलीस ठाणं, घडवली अद्दल

Last Updated:

ज्या पतीवर विश्वास ठेवून तरुणीने सात फेरे घेतले, त्यानेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं अन् अखेर तिला पोलीस ठाणं गाठावं लागलं.

गरोदर पत्नीचा पैशासाठी छळ (प्रतिकात्मक फोटो)
गरोदर पत्नीचा पैशासाठी छळ (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : आळंदीतून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासवणारी घटना समोर आली आहे. ज्या पतीवर विश्वास ठेवून तरुणीने सात फेरे घेतले, त्यानेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं अन् अखेर तिला पोलीस ठाणं गाठावं लागलं. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून 2 लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत एका 29 वर्षीय गरोदर विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, महिला गरोदर असतानाही तिला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी अनघा सागर सुरवसे (वय २९, रा. इंद्रायणी पार्क, आळंदी) यांचा विवाह सागर सुरवसे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. घरातील कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.
अनघा या गरोदर असतानाही सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर दया माया दाखवली नाही. पैशांच्या मागणीसाठी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. "पैसे आणले तरच घरात घेऊ, नाहीतर नांदवणार नाही," असा पवित्रा सासरच्यांनी घेतल्याने अखेर पीडितेने आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
advertisement
अनघा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी सागर अनिल सुरवसे (पती, वय ३०),अनिल प्रेमनाथ सुरवसे (सासरे, वय ६०), मंगल अनिल सुरवसे (सासू, वय ४९), भाग्यश्री आतिश गोतारणे (नणंद, वय ३२) यांच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, गरोदर महिलेवरील या अत्याचारामुळे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
त्या मागणीसाठी गरोदर पत्नीला पट्ट्यानं मारलं; आळंदीतील 29 वर्षीय विवाहितेनं गाठलं थेट पोलीस ठाणं, घडवली अद्दल
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement