Mumbai Crime : काकूला भेटायला गेला अन् अख्खं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात; भयंकर घटना
Last Updated:
ठाण्यातील नौपाड्यात भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या सुजाता आरखडे आणि त्यांच्या नातेवाइकांसोबत भयानक प्रकार घडलेला आहे. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ठाणे : दोन गटांत सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती करणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ठाणे शहरातील नौपाडा परिसरात भांडण शांत करण्यासाठी गेलेल्या सुजाता आरखोड, मोहन ओव्हळ आणि ऋतिक आरखडे अशा तिघांवरही राहुल शिंदे नावाच्या तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केलेला आहे. या सर्व घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल शिंदेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मध्यस्थी पडली महागात
मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिलच्या रात्री सुनिता आरखेड यांचा पुतण्या करण हा आपल्या काकूला भेटण्यासाठी रमाबाई नगर भागात आला होता. दरम्यान तिथं विनोद बचुटे आणि निशांत शिंदे यांनी विनाकारण थांबवून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर आपला पुतण्याबाबत असं काही घडत असल्याने सुनीता आरखडे या काही नातेवाईकांना घेऊन तिथं पोहचल्या.
advertisement
त्यांनी भांडण मिटवून काढण्याचा शांततेत प्रयत्न करत असताना आरोपींनी हिंसक वळ घेतले नंतर राहुल शिंदे याने रागाच्या भरात चाकू काढून तिघांवर वार केले आणि त्यांना मारहाणही केली. पीडित सुनीता आरखडे यांनी 5 एप्रिलच्या सकाळी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सहा जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : काकूला भेटायला गेला अन् अख्खं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात; भयंकर घटना









