advertisement

Pune PMC : '...तर नगरसेवक पद रद्द होईल', पुणे महापालिकेत पिस्तुल घेऊन शिरण्याचा प्रयत्न, आयुक्तांचा सज्जड दम!

Last Updated:

Pune PMC Pistol Controversy : पुणे महानगरपालिकेत पिस्तूल घेऊन जाल तर नगरसेवक पद जाईल, असा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्याच्या नगरसेवकांना दिला आहे.

Pune PMC Corporator Attempt to Intimidate with Pistol
Pune PMC Corporator Attempt to Intimidate with Pistol
Pune PMC News : कधीकाळी विद्येचं माहेरघर म्हटलं जाणारं पुणे आता गुन्हेगारांचं माहेरघर म्हटलं जात आहे. पुण्यातील गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलीये की, आता नगरसेवक देखील स्वत:ला सेफ म्हणू शकत नाही. पुणे महानगरपालिकेत येणाऱ्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडे पिस्तुलांचे प्रमाण वाढलं आहे. अशातच महापालिकेत येणारे अनेकजण सोबत ‘परवानाधारक पिस्तूल’ घेऊन थेट आत प्रवेश करत असल्याचं चित्र समोर आलंय. अशातच पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी गंभीर इशारा दिला आहे.

पुण्याचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत का?

‘परवानाधारक पिस्तूल’ वापरणाऱ्यांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुण्याचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित होतोय. पुणे महापालिकेत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलाय. त्यामुळे महापालिकेत शस्त्रांसह येणाऱ्यावर आता कठोर निर्बंध लागू होणार आहेत.
advertisement

पिस्तूल घेऊन सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न

नगरसेवकांनी पिस्तुल महापालिकेत आणू नये, या अनुषंगाने महापालिकेत मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. अशी माहिती देखील नवल किशोर राम यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मुख्य सभेदरम्यान एका नगरसेवकाने थेट पिस्तूल घेऊन सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सजग सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले.
advertisement

डोक्याला पिस्तुल लावून धमकी

केवळ नगरसेवकच नव्हे, तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शस्त्रे घेऊन फिरत असल्याने सुरक्षेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या दालनाबाहेर ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर’ यंत्रणा बसवण्यात आली आहे.आता महापौरांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आणि कार्यकर्त्याची सखोल तपासणी करूनच त्यांना आत सोडले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागातील एका नागरिकाने अधिकाऱ्यांसमोर डोक्याला पिस्तुल लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता मोठे निर्णय घेतले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune PMC : '...तर नगरसेवक पद रद्द होईल', पुणे महापालिकेत पिस्तुल घेऊन शिरण्याचा प्रयत्न, आयुक्तांचा सज्जड दम!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement