TRENDING:

आईला वाचवण्यासाठी मुलीनं लावली जीवाची बाजी, जालन्यात मायलेकीचा करुण अंत

Last Updated:

Jalna News: जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पंढरपूर वाडी इथं मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पंढरपूर वाडी इथं मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका मायलेकीसाठी शुक्रवारचा दिवस काळा दिवस ठरला आहे. दोघींचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित मायलेकी नेहमीप्रमाणे घराजवळ असलेल्या एका खदानीत कपडे धुवायला गेल्या होत्या. मात्र दोघींचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
mother and daughter death in jalna
mother and daughter death in jalna
advertisement

कावेरी दशरथ मोहिते (वय २८ वर्षे) आणि सोनाली दशरथ मोहिते (वय १३ वर्षे) अशी या मृत मायलेकींची नावं आहेत. दोघींच्या नाकातोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोहिते परिवाराचा आधार हरपला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी मोहिते या शनिवारी आपल्या १३ वर्षांच्या मुलगी सोनालीसह गावाजवळील एका खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांचे काम सुरू असताना अचानक कावेरी यांचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या गटांगळ्या खाऊ लागल्या.

advertisement

आपल्या आईला डोळ्यासमोर मृत्यूशी झुंज देताना पाहून सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्या सोनालीने क्षणाचाही विचार केला नाही. आईचा जीव वाचवण्यासाठी तिने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. मात्र, खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने आईला वाचवण्याच्या प्रयत्नात या चिमुकलीचाही करुण अंत झाला.

पतीने शोध घेतला अन्...

बरेच तास उलटूनही पत्नी आणि मुलगी घरी न परतल्याने पती दशरथ मोहिते काळजीत पडले. त्यांनी शोध घेत खदानीचा परिसर गाठला. मात्र, तिथे गेल्यानंतर जे दृश्य दिसले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. खदानीच्या काठावर कपडे आणि चपला पाहून काहीतरी अघटित घडल्याची शंका त्यांना आली.

advertisement

गावावर पसरली शोककळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात मायलेकींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर आई आणि मुलीला निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईला वाचवण्यासाठी मुलीनं लावली जीवाची बाजी, जालन्यात मायलेकीचा करुण अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल