खड्यात दोघेही कोसळल्याने त्यांचा करूण अंत झाला आहे. खड्यात शेवाळ असल्याने बराच वेळ मृतदेह दिसून येत नव्हते. गळ टाकून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होण्यासाठी कुंडलिका नदीच्या रोहनवाडी पुलाजवळ प्रकल्प होत आहे. या प्रकल्पासाठी नदी पात्रात दोन्ही बाजूंनी पाइप लाइनसाठी खोदकाम केले आहे. परंतु, अनेक दिवसांपासून हे काम झालेले नाही. त्यामुळे पाइप लाइनमध्ये पाणी साचले होते.
advertisement
पाईप लाईनसाठी केलेल्या खोदकामामध्ये, बुडून काही महिन्यांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा आजी-नातवाचा मृत्यू झाला. मृतदेह सापडलेले आजी आणि नातू हे शहरातील लोधी मोहल्ला भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणात नोंद घेण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलिसांकडून केला जात आहे. घाणेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुंडलिका नदीपात्रात अजूनही पाणी आहे.
दरम्यान, पात्रात पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आल्याने यात पाणी साचले आहे. अनेक दिवसांपासून पाणी असल्याने या पाण्यावर पूर्णपणे शेवाळ झाले आहे. आजी-नातू पाण्यात पडले असताना शेवाळामुळे कुणाला दिसले नाही. रात्री उशिरा पाण्यात गळ टाकून शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडले
