मोकाट श्वान खायला अन्न न मिळाल्यास तसेच त्यांची छेडछाड केल्यास हिंस्र होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. अनेकदा रस्त्यावरून जात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि वृद्धांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांना खायला मिळेल याची व्यवस्था करणे, उघड्यावर होत असलेली मांस विक्री, तसेच वाढलेली कुत्र्यांची संख्या, यामुळे या घटना वारंवार घडत आहेत.
advertisement
Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!
कुत्र्यांची नसबंदी करावी तसेच त्यांचे रेबीज लसीकरण करावं. यासाठी आम्ही वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु महापालिकेकडून म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आम्ही मुंबई येथील समस्त महाजन संस्थेला संपर्क केला व त्यांच्या माध्यमातून शहरातील मोकाट श्वानांचे रेबीज लसीकरण सुरू केले आहे.
आतापर्यंत 300 श्वानांचे लसीकरण करण्यात आले असून शहरातील सर्व 5000 कुत्र्यांना रेबीजची लस देण्याचे समस्त महाजन संस्थेचे लक्ष आहे. लस देण्यात आलेल्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये ओळख पटवण्यासाठी एक पट्टा टाकण्यात आला आहे.
तर महापालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. समस्त महाजन संस्थेच्या माध्यमातून कुत्र्यांना एक वेळचा आहार देण्याचे देखील नियोजन करण्यात आल्याचे प्राणी मित्र खुशी उगले त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोकाट श्वानांप्रती आपुलकीचा व्यवहार ठेवल्यास ते हिंस्र होणार नाहीत. लहान मुले असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी मोकाट श्वानांची छेड काढू नये, असे आवाहन देखील खुशी उगले यांनी केले आहे.





