TRENDING:

हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं

Last Updated:

Jalna News: सुखदेव वैद्य यांच्या मुलीचा विवाह 8 मार्च रोजी ठरला आहे. त्यामुळे ते पत्नीसह नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी जात होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: सध्याच्या काळात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये लाडक्या लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी जात असलेल्या वडिलांचाच मृत्यू झाला, तर आई या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं
advertisement

बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील वैद्य कुटुंबात लग्न सोहळ्याची लगबग होती. 8 मार्च रोजी सुखदेव वैद्य यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला होता. त्यामुळे ते आपल्या पत्नीसह नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी जालन्याकडे जात होते. याचवेळी बदनापूर येथील दुधना नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला.

घरात कुणी नव्हतं, जावा-जावांचं बिनसलं, बार्शीत भयंकर घडलं, आता जन्माची अद्दल!

advertisement

वैद्य यांच्या दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुखदेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर वर्षा वैद्य या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढलेले अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे रस्ते वाहतूक अनियंत्रित झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल