परभणी येथील डॉ. जगदीश शिंदे आणि परतुर येथील डॉ. नक्षत्रा बागल यांचा साक्षगंध सोहळा परतूर येथे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर दांपत्य असल्याने विवाह सोहळा आणि साक्षगंध सोहळा अत्यंत धूमधडाक्यात होणार होता. परंतु, साखरपुड्याआधी मराठा समाजातील लोकांनी एकत्रित एक बैठक बोलावली आणि या बैठकीत अहिल्यानगर येथे जाहीर झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाविषयी चर्चा झाली. सगळ्यांच्या सहमतीने कमी पाहुण्यांमध्ये आणि अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपण्याचा ठरलं, असं नववधूचे भाऊ ॲड. विशाल बागल यांनी सांगितलं.
advertisement
Rugan Seva: रुग्णसेवक असावा तर असा, रुग्णांची सेवा करण्यासाठी सोडली नोकरी, मोफत करतोय काम, Video
लग्नात डीजे आणि जास्त पाहुणे देखील नव्हते. अशा पद्धतीने अत्यंत साध्या पद्धतीने या डॉक्टर दांपत्याचा विवाह सोहळा परतुर येथे संपन्न झाला. मराठा समाजाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार म्हणजेच केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हुंडा न घेता आणि डीजे न लावता झालेल्या या विवाह सोहळ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा होतीये. राज्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज घटक या विवाहसोहळ्याकडून प्रेरणा घेऊन लग्नातील अनावश्यक खर्च टाळतील, अशी अपेक्षा करूयात.





