जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जालना पोलिसांनी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नियमाप्रमाणे रील सादर करणे आवश्यक असणार आहे.
स्पर्धेची नियमावली
रिल्सचा विषय हा अमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या दिलेल्या दोन विषयांशीच संबंधित असावा. सदर रिल्स स्पर्धेचा प्रवेश मोफत असून महाराष्ट्रातील सर्वांसाठी खुला आहे. आपली रिल्स ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेपैकी एका भाषेत असणे आवश्यक आहे.
advertisement
प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! संभाजीनगर-पुणे दरम्यान धावणार 'इतक्या बस', लगेच चेक करा वेळापत्रक
रिल्समध्ये काय हवे काय नको?
रिल्स मध्ये अश्लीलता किंवा बीभत्स कृत्य अथवा क्रूरता, किळसवाणे प्रसंग यामध्ये टाकता येणार नाही. याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. तसेच रिल्स मध्ये दाखवलेले प्रसंग हे सेन्सॉरच्या अधिनियमानुसार असणे आवश्यक आहे. रिल्स मध्ये वापरलेली सामग्री ही स्वतःच्या मालकीची किंवा परवानाधारक असणे आवश्यक आहे.
रिल्सचा वेळ
रिल्स सादरीकरणाची एकूण वेळ 30 सेंकद ते 180 सेंकदा (3 मिनिट) पर्यंत असणे आवश्यक आहे. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख दि.10 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत असेल. आपल्या रिल्सची प्रवेशिका 9021701000 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करून PDF स्वरूपात माहिती मागवून भरून देणे आवश्यक आहे. आपली रिल्स ही जालना jainapolicereels@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे.
स्पर्धकांनी प्रवेश फॉर्म भरल्यानंतर ईमेल आयडीवर रिल्स पाठवल्यानंतर Whatsapp ग्रुप जॉईन करावा. रिल्स मध्ये कोणतेही कॉपीराईट लोकेशन, प्रसंग, संगीत साहित्य वापरलेले नसावेत. तसेच रिल्स ही कॉपीराईट केलेली नसावी.
रिल्स ही स्पर्धेसाठी नवीन असणे आवश्यक आहे. तसेच रिल्स ही सोशल मीडियावर टाकलेली नसावी.
स्पर्धा कधी आणि कुठे?
रिल्स स्पर्धा ही दि. 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. 10 नोव्हेंबरपर्यंत आपली प्रवेशिका दिलेल्या नंबरवर भरून पाठवावी आणि आपली रील ईमेल आयडीवर पाठवावी. स्पर्धेचा कालावधी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 25 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असेल.
सर्व स्पर्धकांनी पाठवलेल्या रिल्स पैकी आक्षेपार्ह वगळून बाकी सर्व रिल्स 7 नोव्हेंबर रोजी आयोजकांच्या परवानगीने स्पर्धकांनी आपल्या आयडीवरून spjalna या इन्स्टा आयडीला Collaboration करून अपलोड करणे बंधनकारक राहील.
निवड प्रक्रिया
सर्वाधिक लाईक प्राप्त झालेल्या रिल्सला प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात येईल व त्यानंतर सर्वाधिक द्वितीय विजेता हा त्यापेक्षा कमी लाईक्स असलेल्या रिल्स ठरेल. तसेच या व्यतिरिक्त अमली पदार्थ व इतर पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या दोन्ही विषयांवरती वेगवेगळे बेस्ट रिल्स आयोजक निवड करतील. परीक्षकांनी निवडलेल्या रिल्सचा निकाल हा अंतिम व बंधनकारक राहील.
रिल्ससाठी पारितोषिक
- प्रथम पारितोषिक - सर्वाधिक लाईक्स रु 15000/- रोख रक्कम व स्मृतिचिन्ह,
- द्वितीय पारितोषिक - सर्वात द्वितीय लाईक्स रु 10000/- रोख रक्कम व स्मृतिचिन्ह,
- बेस्ट रिल्स महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या विषयावरील सर्वोत्कृष्ट रिल्स रु.10000/- रोख रक्कम व स्मृतिचिन्ह
- बेस्ट रिल्स- अंमली पदार्थ दुष्परिणाम या विषयावरील सर्वोत्कृष्ट रिल्स रु. 10000/- रोख रक्कम व स्मृतिचिन्ह
पारितोषिक वितरण
18 नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा होईल. जालन्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशिक्षण कक्ष येथे हा सोहळा होईल.
दरम्यान, जालना पोलीस दलातर्फे महाराष्ट्रातील सर्व जनतेला, रील स्टार व सर्व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार वरील विषयांवर रिल्स तयार करून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घेऊन सुरक्षित महिला व व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजय सोनवणे 9021701000 या क्रमांकावर संपर्क साधावा.






