TRENDING:

Maratha Reservation : सागर बंगल्यावर जाणारच! जरांगे ठाम; अंबड तालुक्यात संचारबंदी, जालन्यात बस पेटवली

Last Updated:

अंबड तालुक्यात संचरबंदी लागू केल्यानं पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. भांबेरीत मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जैस्वाल, जालना : जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेलीय. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केलीय.
News18
News18
advertisement

अंबड तालुक्यात संचरबंदी लागू केल्यानं पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. भांबेरीत मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस बळाचा वापर करणार नाही, मराठा आंदोलकांनी सहकार्य करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार यावर ठाम आहेत. आजच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केलीय. फडणवीस यांच्याविरोधात प्रचंडा नाराजीची लाट उसळळी आहे. फडणवीसांशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत. आंदोलकांनी संयाने आंदोलन करावं असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे.

advertisement

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत बस पेटवण्यात आली आहे. मराठा आंदोलकांची धरपकड केल्यानं आंदोलक आक्रमक झाले आहेत. जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी बस पेटवून दिल्याची घटना घडलीय. जरांगे पाटील यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झालेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

मराठा आंदोलन आक्रमक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधून छत्रपती संभाजी नगर व जालना मार्गे जाणारी बस सेवा बंद करण्याचा निर्णय बीड आगाराने घेतला आहे. मध्यरात्रीपासूनच बसच्या फेऱ्या बंद केले आहेत. पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून एसटी बस विभागाने हा निर्णय घेतला. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला.खबरदारीचा उपाय म्हणून रापमच्या बीड विभागाने रात्री पासूनच छत्रपती संभाजीनगर, जालना या मार्गे जाणाऱ्या बस अचानक रद्द केल्या आहेत..

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : सागर बंगल्यावर जाणारच! जरांगे ठाम; अंबड तालुक्यात संचारबंदी, जालन्यात बस पेटवली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल