TRENDING:

जालना, छत्रपती संभाजीनगरवर पाणी संकट, पाणीपुरवठा खंडित होणार, कारण काय?

Last Updated:

वारंवार मागणी करून देखील छत्रपती संभाजीनगर आणि जालना मनपाने थकीत पाणीपट्टी बिल न भरल्याने मंगळवारपासून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : वारंवार मागणी करून देखील छत्रपती संभाजीनगर आणि जालना मनपाने थकीत पाणीपट्टी बिल न भरल्याने मंगळवारपासून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गंगापूर आणि पैठण नगरपालिकेलाही पाणीपट्टी बिलाची रक्कम अदा केल्यास पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे तब्बल 54 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी केवळ चार कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. जालना महानगरपालिकेकडे नऊ कोटी 68 लाख रुपयांच्या बिलाची थकबाकी असून यापैकी एकही रुपया अदा करण्यात आलेला नाही.
Jaykwadi dam
Jaykwadi dam
advertisement

जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर शहराला दरमहा 4.50 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. कडा कार्यालयाकडून महापालिकेला दरमहा 1 कोटी 25 लाख रुपयांचे बिल देण्यात येते. महापालिकेकडून क्वचितच पाणीपट्टीचे बिल नियमित अदा करण्यात येते. यामुळे बिलाची रक्कम वाढत असते. वेळेवर बिल न भरण्यास जलसंपदा विभागाकडून या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. जानेवारी 2025 अखेर महापालिकेकडे 53 कोटी रुपयांची पाणी बिले थकीत आहेत.

advertisement

Summer Tips: कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊन खाताय? उन्हाळ्यात अजिबात करू नका ही चूक, आरोग्याला धोका!

जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर, जालना यासह पैठण, गंगापूरनगर परिषदांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित पाणी बिल पाठविण्यात येते. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे 53 कोटी रुपयांचे बिल थकीत आहे. मात्र, मनपाकडून वर्षभरात केवळ 4 कोटी 5 लाख रुपये अदा झाले. जालना मनपा, गंगापूर, पैठण नगरपरिषदांनी वर्षभरात एक रुपयाही अदा केला नाही. बिल जमा न केल्यास मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता दीपक डोंगरे यांनी दिली आहे.

advertisement

आतापर्यंत 4 कोटी 50 लाख रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम अदा करावी, यासाठी कडा कार्यालयाचे अधिकारी वारंवार मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिल अदा करण्याची विनंती करीत असतात. महापालिकेला नोटीस बजावून सोमवारपर्यंत बिल अदा न केल्यास मंगळवारी जयकवाडी येथून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालना, छत्रपती संभाजीनगरवर पाणी संकट, पाणीपुरवठा खंडित होणार, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल