TRENDING:

Jamkhed News: दिपालीच्या पाठोपाठ संदीप लॉजवर गेला, नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी सांगितलं नर्तिकेच्या मृत्यूचं कारण

Last Updated:

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या नर्तिकेच्या आत्महत्या प्रकरणी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : जामखेडमध्ये नृत्यांगणा दिपाली पाटील या तरूणीने एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली असून भाजप नगरसेवक संदिप गायकवाड लग्नासाठी दबाव आणल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली ही मुळची कल्याण येथील रहिवासी आहे. ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध करायला सुरूवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली आज आहे. रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याची माहिती समोर आली आहे.लॉजवर गेल्यानंतर दिपालीच्या पाठोपाठ संदिप देखील तिथे पोहचल्याचे समोर आले आहे.

advertisement

रोहित पवारांनी काय आरोप केला? 

त्यानंतर आता रोहित पवारांनी ट्वीट करत खळबळजनक आरोप केला आहे. संदीप गायकवाडने दिपालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे. संदीप गायकवाडचे लग्न झाले होते. लग्न झालेले असतानाही तो दिपालीवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे रोहित पवार म्हणाले.

महिलेला न्याय मिळवून देण्याची रोहित पवारांची मागणी

advertisement

रोहित पवार पुढे म्हणाले, या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहणार आहे.

सखोल तपास करण्याची गरज 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हा काय प्रकार! चक्क उलट्या दिशेने धावू लागल्या रिक्षा, सांगलीत नेमकं काय घडलं?
सर्व पहा

दिपाली पाटील आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल डिटेल्स आणि दिपालीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी या सर्व गोष्टी तपासाचा मुख्य भाग ठरणार आहेत. यातूनच नृत्यांगनेच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यास मदत होईल, असे पोलीस म्हणाले आहे

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jamkhed News: दिपालीच्या पाठोपाठ संदीप लॉजवर गेला, नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी सांगितलं नर्तिकेच्या मृत्यूचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल