फुलांच्या 850 हून अधिक प्रजाती
कास पठारावर सध्या पिवळी, जांभळी, गुलाबी आणि निळी अशा विविध रंगांची फुले फुलली आहेत. यामध्ये करवी, सोनकी, टॉपली करवी, पांढरी बकुळी आणि अबोली अशा अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. या पठारावर एकूण 850 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काही फक्त याच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे हे पठार पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक खास ठिकाण आहे.
advertisement
प्रवेशासाठी नियम आणि ऑनलाइन बुकिंग
- पर्यटकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि फुलांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. एका दिवसात मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातो, त्यासाठी ऑनलाइन तिकिटांची सोय करण्यात आली आहे.
- तिकिट बुकिंगसाठी : www.kas.ind.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करता येते.
- भेट देण्याची वेळ : पर्यटकांसाठी दिवसातून तीन स्लॉट उपलब्ध आहेत. सकाळी 7 ते 11, दुपारी 11 ते 3 आणि संध्याकाळी 3 ते 6.
advertisement
कसं करायचं बुकिंग?
- सर्वप्रथम www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- मुख्य पानावर “Book Tickets” किंवा “Visitor Entry” हा पर्याय निवडा.
- तुम्हाला कास पठार भेट द्यायची तारीख निवडा.
- उपलब्ध स्लॉट (सकाळ किंवा दुपार) तपासा. दररोज मर्यादित लोकांनाच प्रवेश मिळतो.
- तुमची वैयक्तिक माहिती (नाव, मोबाइल नंबर, ई-मेल) भरा.
- पर्यटकांची संख्या आणि तिकिटांचा प्रकार (प्रौढ/मुले) निवडा.
- ऑनलाइन पेमेंट (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग) करून बुकिंग पूर्ण करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला ई-मेलवर किंवा मोबाईलवर ई-तिकीट मिळेल.
- प्रवेश करताना हे ई-तिकीट मोबाईलवर दाखवले तरी चालते किंवा प्रिंट घेऊन नेऊ शकता.
advertisement
सकाळचा वेळ हा फुलांचा बहर, सौम्य प्रकाश आणि थंड हवेमुळे सर्वात उत्तम मानला जातो. फुले तोडणे किंवा गवतावर पाय ठेवणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे. या वर्षीचा फुलांचा बहर सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पाहायला मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फुलांनी नटलेलं 'कास पठार' पाहायचंय? भेट देण्यापूर्वी नक्की वाचा तिकीट बुकिंगपासून वेळेपर्यंतची A to Z माहिती...