दोन्ही पक्ष स्पष्ट बहुमतापासून दूर आहेत. स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ चा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. इथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ११ तर मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गट किंवा भाजपला आपला महापौर करायचा असेल तर ठाकरे बंधूंच्या १६ नगर सेवकांचा गरज लागणार आहे. आता हे सगळे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
शिवसेना शिंदे पक्षातून उमेदवारी न मिळालेले सहा ते सात नवनियुक्त नगरसेवक उबाठा आणि मनसे पक्षातून निवडून आल्याने त्याची मनधरणी करून सत्ता स्थापने साठी शिवसेना शिंदे गट प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे. तर मनसेचे दोन नगरसेवक ठाकरे गटाच्या चिन्हावर लढले असून तेही जिकूंन आले आहेत. त्यामुळे मनसेकडे 7 नगरसेवक आहेत. या निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवक आपल्या सोबत यावे आणि मनसे सोबत युती करावी असे प्रयत्न भाजप आणि शिंदेची शिवसेना करत असली तरी शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पण ठाकरेंचे ११ आणि मनसेचे पाचही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. सर्वांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पक्षात फुटाफूट होऊ नये, यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणने ठाकरे गट आणि मनसेनं आपल्या नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या अज्ञातस्थळी हलवलं आहे. सर्व नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपसमोर सत्ता स्थापनेचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
