TRENDING:

जिमला जायचं होतं पण आडबाजुला नेलं, सोबत चाकू अन् ॲसिड, कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचं तरुणीसोबत भयंकर कृत्य

Last Updated:

कल्याण पश्चिममध्ये एका रॅपिडो बाईक चालकाने प्रवासी तरुणीसोबत धक्कादायक प्रकार केला आहे. तरुणीला जिमला जायचं होतं, मात्र आरोपीनं तिला आडबाजुला घेऊन जात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रदीप भानगे, प्रतिनिधी कल्याण: ठाणे जिल्ह्याच्या कल्याण पश्चिम परिसरातील सिंधी गेट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका रॅपिडो बाईक चालकाने प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पीडित तरुणीने प्रसंगावधान राखत दाखवलेल्या हिमतीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांच्या मदतीने आरोपी चालकाला तत्काळ पकडण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बूक केली होती. मात्र चालकाने तिला जिममध्ये न सोडता कल्याण पश्चिमेतील पोलीस लाईनजवळील अंधाराच्या ठिकाणी नेलं. तिथे चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरू केला.

यावेळी तरुणीने स्वतःचा बचाव करत आरडाओरडा केला तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक एकत्र आले. त्यांनी विचारपूस केली असता तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि तरुणीने संबंधित रॅपिडो चालकाला पकडून भररस्त्यात चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित तरुणी आरोपीकडे चाकू आणि अॅसिड असल्याचा दावा करत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीची क्रांती पाहायची तर थेट इथं जायचं, पुण्यात भरलंय सर्वात मोठं कृषी प्रदर्शन
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांकडून तरुणीची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी चालकाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिमला जायचं होतं पण आडबाजुला नेलं, सोबत चाकू अन् ॲसिड, कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचं तरुणीसोबत भयंकर कृत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल