TRENDING:

'मला क्लोज फ्रेंड सारखं वागव', कॅबिनमध्ये बोलवून शिक्षकाचं तरुणीसोबत अश्लील कांड, कोल्हापुरातील नामांकीत कॉलेजमधला प्रकार

Last Updated:

कोल्हापूरमधील प्रसिद्ध के.आय.टी. (KIT) इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: कोल्हापूरमधील प्रसिद्ध के.आय.टी. (KIT) इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दिवसांपासून आरोपी प्राध्यापक विद्यार्थिनीशी अशाप्रकारे वर्तन करत होता. अखेर पीडित विद्यार्थिनीने हिंमत करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

सौरभ जोशी असं गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. जोशी हा वर्गामध्ये शिकवत असताना काही विद्यार्थिनींना विनाकारण 'टार्गेट' करत होता. त्यानंतर अभ्यासाच्या किंवा अन्य कामाच्या बहाण्याने तो विद्यार्थिनींना आपल्या केबिनमध्ये बोलावायचा. केबिनमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तो विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करायचा, असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीनं कॉलेजमधील चार ते पाच इतर विद्यार्थिनींशी देखील अशाच प्रकारे वर्तन करायचा.

advertisement

केबिनमध्ये बोलवून करायचा अश्लील चाळे

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी ही मुळची पंढरपूरमधील रहिवासी असून कोल्हापुरात शिक्षण घेते. येथील केआयटी कॉलेजमध्ये ती सिव्हील एन्व्हायरमेंटच्या दुसऱ्या वर्गात शिकते. याच विभागात सौरभ जोशी एचओडी आहे. २० जानेवारी रोजी आरोपी सौरभ जोशी हा पीडितेच्या वर्गात केमिस्ट्री विषय शिकवायला आला होता. यावेळी त्याने तरुणीवर प्रश्नांचा भडीमार केला. यातील काही प्रश्नांना पीडितेला उत्तरं देता आली नाहीत. यानंतर जोशीनं तिला अभ्यासाबद्दल विचारपूस करण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावले, इथं त्याने पीडितेशी समजूत घालून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

advertisement

'ट्रीट मी अॅज यूवर क्लोज फ्रेंड'

एवढंच नाही तर आरोपी जोशी हा इतर विद्यार्थ्यांशी मैत्री करू नको. मला मेसेज करत जा. व्यायाम करत जा. मेडिटेशन करत जा. काही अडचण आली तर मला सांगत जा, असं म्हणत पीडितेच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. 'ट्रीट मी अॅज यूवर क्लोज फ्रेंड' असं म्हणत आरोपीनं अश्लील चाळे केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. तसेच फोनवर बोलण्यासाठी शिक्षक फोर्स करत होता, असंही तिने तक्रारीत म्हटलं.

advertisement

या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा सौरभ जोशीने केबिनमध्ये बोलवलं. बोलता बोलता आपल्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर मी सरांवर ओरडले. आणि तिथून निघून गेले. पण यानंतर शिक्षकाचा त्रास वाढतच गेला. केबिनमध्ये बोलवू लागला. पण मी गेले नाही. त्यामुळे त्याने वर्गात टार्गेट करायला सुरुवात केली, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. हा त्रास वाढत गेल्यानंतर अखेर पीडित तरुणीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली.

advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

गोकुळ शिरगाव पोलिसांनी पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून प्राध्यापक सौरभ जोशी याच्याविरुद्ध विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी काही विद्यार्थिनींसोबत असा प्रकार घडला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षकच अशाप्रकारे विद्यार्थिंनींशी अश्लील वर्तन करत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मला क्लोज फ्रेंड सारखं वागव', कॅबिनमध्ये बोलवून शिक्षकाचं तरुणीसोबत अश्लील कांड, कोल्हापुरातील नामांकीत कॉलेजमधला प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल