साडेआठ हजार कॅमेऱ्यांची जिल्ह्यावर नजर
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे साडेआठ हजार गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदणी करणे आणि आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे. काही मंडळांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते, ज्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास होतो. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले की, "सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. यातील किमान एक कॅमेरा मंडळांनी वर्षभर आपल्या परिसरात कायमस्वरूपी ठेवावा. यामुळे जिल्ह्यातील साडेआठ हजार मंडळांच्या कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत होईल आणि जिल्ह्यावर पोलिसांची प्रभावी नजर राहील."
advertisement
तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल
जबरदस्तीने वर्गणी घेतल्याची कोणतीही तक्रार आल्यास संबंधित मंडळांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मंडळांकडून जबरदस्ती केली जात असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल आणि संबंधित मंडळांना तातडीने अद्दल घडवली जाईल.
मंडळांसोबत बैठकांचे आयोजन
पोलिसांनी आपापल्या हद्दीतील गणेश मंडळांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांची बैठक नुकतीच पार पडली असून, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांची बैठक लवकरच पुईखडी येथे होणार आहे.
हे ही वाचा : IAS Vipin Itankar: तो स्लॅब कसा पडला? बावनकुळेंनी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
हे ही वाचा : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!