कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तयारी अंतिम टप्प्यात असून, मुंबई उच्च न्यायालयातील कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमधील 50 ते 60 हजार खटले पहिल्या टप्प्यात येथे वर्ग केले जाणार आहेत. यासाठी...
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमधील सुमारे 50 ते 60 हजार खटले पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग केले जाणार आहेत. यासाठी बहुतांश खटल्यांची कागदपत्रे बांधून तयार ठेवण्यात आली आहेत. सर्किट बेंचच्या इमारतीचे काम पूर्ण होताच ही कागदपत्रे कोल्हापुरात पोहोचतील, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनने दिली आहे.
स्वतंत्र वेबसाईट आणि 700 वकिलांना संधी
या सर्व खटल्यांची स्थिती पाहण्यासाठी सर्किट बेंचची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षकारांना आपल्या खटल्याची माहिती ऑनलाइन पाहता येईल. सध्या मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमधील सुमारे 150 ते 200 वकील काम करत आहेत. सर्किट बेंच सुरू झाल्यावर त्यांच्यासह सुमारे 700 वकील येथे कामकाज पाहतील. यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांना मोठी संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा बार असोसिएशनने व्यक्त केला आहे.
advertisement
चार न्यायमूर्ती पाहणार कामकाज
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एक डिव्हिजन बेंच (ज्यात दोन न्यायमूर्ती असतील) आणि दोन सिंगल बेंच (प्रत्येकी एक न्यायमूर्ती) मंजूर झाले आहेत. असे एकूण चार न्यायमूर्ती सर्किट बेंचचे कामकाज पाहतील. सर्किट बेंचमध्ये दिवाणी आणि फौजदारी खटले, अपील, जनहित याचिका, जामीन अर्ज, तक्रार अर्ज, हरकत आणि रिट पिटिशन यांसारख्या प्रकरणांचे काम चालणार आहे.
advertisement
इतर महत्त्वाच्या नियुक्त्या
- 3 रजिस्ट्रार (Registrar) यांची नियुक्ती झाली आहे.
- 14 सरकारी वकिलांची नियुक्ती झाली आहे.
- 4 न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा आदेश लवकरच निघण्याची शक्यता आहे.
सुमारे 150 कर्मचाऱ्यांचा स्टाफ 15 ऑगस्टला सर्किट बेंचमध्ये हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्किट बेंच सुरू झाले असले, तरी पार्किंगचा प्रश्न अद्यापही कायम आहे. या संदर्भात आज महापालिका प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्यासोबत चर्चा होणार असून, पार्किंगसाठी दसरा चौक, व्हिनस कॉर्नर आणि खानविलकर पंपाजवळील 100 फुटी रोड यांसारख्या पर्यायांवर विचार केला जाईल.
advertisement
हे ही वाचा : IAS Vipin Itankar: तो स्लॅब कसा पडला? बावनकुळेंनी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 6:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!