राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापुरात तुफान पाऊस कोसळतोय. कोल्हापुरांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण, कोल्हापूरातील पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. सध्याची पाण्याची पातळी 37.3 फुटांवर आहे. शिवाय जिल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर: अतिमुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्र सोडून सध्या वाहताना दिसत आहे. याच पंचगंगा नदीचे छत्रपती शिवाजी महाराज पूल आणि राजाराम बंधारा या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून भयावह दृश्य नजरेस पडत आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग केली. उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यात मुसळधार, कोल्हापूराला उद्यासाठी इशारा:
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील विविध शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाने सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नागरिकांना रहदारी करण्यास अडचण निर्माण होत आहे. तर कोल्हापुर जिल्ह्यात उद्यादेखील मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. तसेच धरणांतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे नियमन देखील सुरू केले जाणार आहे, कारण 2019 ला घडलेल्या काही चुकांमुळे मोठी पुरस्थिती उद्भवल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं.
राज्यभरात काय परिस्थिती?
विदर्भातील नागपूरमध्ये ही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या पावसाचा जनजीवनावरही परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते आहे. पुढील 24 तास राज्यावरील पावसाचा जोर हा कायम असणार आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांना तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईत मागील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Satara Rain: सातारा जिल्ह्यात मुसळधार, पण महाबळेश्वरमध्ये कमी पाऊस, कारण काय?
