कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली.
या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
advertisement
या आगीत नाट्यगृहाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
advertisement
या आगीत खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज आहे. या मैदानातील सभामंडपालाही आग लागल्याचे बोलले जात आहे.
केशवराव भोसले नाट्यगृह बहुतांश लाकडापासून बांधले असल्याने आगीने लगेच रौद्ररुप धारण केलं.
advertisement
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 08, 2024 10:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News : कोल्हापुरात प्रसिद्ध केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी! वेदनादायक PHOTOS